आरती केदार हिची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरती केदार हिची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड

पाथर्डी (प्रतिनिधी) अभिजित खंडागळे येथील बाबूजी आव्हाड महाविद्यालयाची विद्यर्थिनी कु. आरती केदार हिची बीसीसीआय आयोजित उत्तराखंड येथे होणाऱ्या सिनि

महाराष्ट्राच्या महिला क्रिकेट संघात नगर जिल्ह्यातील खेळाडूंनी आपल्या खेळाचा दबदबा कायम राखला -आ.अरुणकाका जगताप
अफगाणिस्थानात होणार क्रिकेट मालिका… ‘हा’ संघ दौरा करण्याची शक्यता
दुबळ्या अफगाणिस्तानवर टिम इंडिया बरसली ; रागावलेल्या भारतीयांना दिवाळ भेट दिली !

पाथर्डी (प्रतिनिधी) अभिजित खंडागळे

येथील बाबूजी आव्हाड महाविद्यालयाची विद्यर्थिनी कु. आरती केदार हिची बीसीसीआय आयोजित उत्तराखंड येथे होणाऱ्या सिनियर महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र महिला रणजी क्रिकेट संघात निवड झाली आहे. 

कु. आरती केदार ही एस. व्ही. नेट क्रिकेट अकॅडमी मध्ये गेली ८ वर्ष प्रशिक्षक शशिकांत निऱ्हाळी यांचेकडे क्रिकेटचे प्रशिक्षण घेत आहे.

 तिच्या या यशाबद्दल पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष ऍड. सुरेशराव आव्हाड, प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक प्रा. विजय देशमुख, प्रा. सचिन शिरसाट  आदींनी तिचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS