आमदार व नगराध्यक्षना प्रसिद्धीची हौस नाही- नगराध्यक्ष वहाडणे

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

आमदार व नगराध्यक्षना प्रसिद्धीची हौस नाही- नगराध्यक्ष वहाडणे

नगराध्यक्ष व आमदार प्रसिद्धीला हपापलेले आहेत असा आरोप करणाऱ्या  उपनगराध्यक्षांचा यात काहीच दोष नाही.

काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांची वृत्त लोकांची दिशाभूल करणारे
निळवंडेतून पाणी सोडण्याची घाई दबावापोटी नको
जामखेड शहरात अल्पवयीन मुलीने केली आत्महत्या

कोपरगाव शहर प्रतिनिधी- नगराध्यक्ष व आमदार प्रसिद्धीला हपापलेले आहेत असा आरोप करणाऱ्या  उपनगराध्यक्षांचा यात काहीच दोष नाही.”संजीवनीवर” तयार होऊन आलेल्या बातमीवर त्यांचे फक्त नांव असते.आमदार व नगराध्यक्षना स्वतःची प्रसिद्धी करण्यास काही हौस नाहीय अशी टीका नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केली आहे.      या वेळी वहाडणे यांनी बोलतांना सांगितले की, खरे तर याआधी कोपरगाव नगरपरिषदेची निवडणुक होण्यापूर्वी कुठलाही कार्यादेश नसतांना श्री.व सौ.कोल्हे यांनी घाईघाईने वाचनालय इमारत,नगरपरिषद कार्यालय व जिजामाता उद्यान या तीनही कामांचे भूमिपूजन व कोनशीला लावण्याचे काम केले.पुन्हा सत्ता मिळण्याची शक्यता नसल्याने तुम्ही दि.१६ सप्टेंबर २०१६  रोजी सदरच्या कोनशीला लावून घेतल्या.त्या कोनशीला बनविण्याचे काम करणाऱ्यास अजूनही बिल दिले गेले नाही.त्यानंतर २०१७ मध्ये कार्यादेश नसतांना श्री.बिपिनराव कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कामांचे भूमिपूजन करण्याचा आग्रह तुम्हीच धरला होता हे आठवत नाही का?
          सध्या होत असलेल्या विकास कामांचे भूमिपूजन केले तर नगराध्यक्ष व आमदारांना प्रसिद्धीची हौस आहे असे हास्यास्पद आरोप करायचे.मी तर आजपर्यंत एकदाही माझ्या फोटोचा फ्लेक्स बोर्ड लावू दिलेला नाही,लावलेला नाही.एकदा तर लावलेला फ्लेक्स काढायला लावला.आजपर्यंत बहुसंख्य वेळा ध्वजारोहण करण्याची, भूमिपूजन-उदघाटन करण्याची दुसऱ्यांनाच संधी दिली.कोल्हे तर कोरोनारुग्णांना “पुरण पोळ्या” वाटतानाचेही फोटो काढून किळसवाणी प्रसिद्धी मिळवितात. पुरण पोळ्याही  संजीवनीच्याच खर्चाने. तुम्ही सुरू केलेल्या कोविड सेंटरबद्दल अभिनंदन. खरे तर कोल्हे यांनी नगरसेवकांचा वापर करून कशा प्रकारचे डावपेच नगरपरिषदेत केले हे जनतेला साडेचार वर्षात चांगलेच अनुभवास आले आहे. मी नगरसेवकांना दोष देणार नाही,कारण येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी मिळविण्यासाठी संजीवनीचा आदेश पाळावाच लागतो.केवळ काही नगरसेवकच नव्हे तर अजून ४ ते ५ भाटही याच कामासाठी पोसलेले आहेत. महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथीच्या फ्लेक्सवरही पती पत्नीचे  फोटो का असतात? फ्लेक्सचा खर्चही शेतकरी सभासदांच्या संजीवनीतूनच भागविला जातो ना? तुम्हीच मला बोलायला भाग पाडता. कोरोनाच्या संकटात मी टिका टिप्पणी करायची नाही असेच ठरविले होते.पण तुम्ही शांत रहाणार नसल्याने नाईलाजाने मला प्रतिक्रिया द्यावीच लागते अशी खरमरीत टीका विजय वहाडणे यांनी माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांच्यावर केली आहे.

COMMENTS