कोपरगाव /ता.प्रतिनिधी - साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या अध्यक्षपदी निवड आणि पूरग्रस्त व्यापार्यांना राज्यसरकारच्यावतीने सरकारी मदत मिळ
कोपरगाव /ता.प्रतिनिधी – साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या अध्यक्षपदी निवड आणि पूरग्रस्त व्यापार्यांना राज्यसरकारच्यावतीने सरकारी मदत मिळवून दिल्याबद्दल कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ आणि कोपरगाव तालुका किराणा मर्चट असोसिएशनच्या वतीने व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे आणि किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार बंब यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला.
नागरी सत्काराला उत्तर देताना आमदार आशुतोष काळे म्हणाले की, कोरोना महामारीमुळे कोपरगाव शहरातील व्यापारी वर्ग अडचणीत आला असून ग्राहक संरक्षण कायद्याच्या अनुषंगाने व्यापार्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार असून समृद्धी महामार्गाचे काम राज्य सरकार कडून लवकरात लवकर करून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. अध्यक्षीय मनोगतातून काका कोयटे म्हणाले की, कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे हे महाराष्ट्रातील आमदारांमध्ये विकासाच्या बाबतीत पहिल्या 10 मध्ये असून त्याचे कार्य कर्तृत्वामुळे शिर्डी विश्वस्त व्यवस्थेचे अध्यक्षपद मिळाल्यामुळे, त्यांना चांगली संधी मिळाली असून नवीन ओळख निर्माण करण्याची संधी प्राप्त झाली आहे. तसेच व्यापारी महासंघाचे छोटे-मोठे व्यापारी हे स्वतःच्या खिशाला कात्री लागली तरी सामाजिक दायित्व सोडत नाही. त्यामुळे कोपरगाव तालुक्याचा विकास करताना कोपरगावची बाजारपेठ ओस पडू नये यासाठी शहरातील व्यापार्यांच्या मूलभूत समस्यांकडे लक्ष देऊन त्या सोडवाव्यात. विशेषतः शहरातील रस्ते, स्वच्छ पाणी यांसह भाजी मार्केट प्रमाणे फळांचे मार्केट, ग्रामीण भागातून शहरात येणार्या ग्राहकांसाठी पार्किंग व्यवस्था आणि समृध्दी महामार्ग कोपरगाव जवळून जात असल्याने मुंबई कोपरगावच्या जवळ येत आहे. किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार बंब, व्यापारी महासंघाचे जेष्ठ पदाधिकारी अजित लोहाडे, कार्याध्यक्ष सुधीर डागा, माजी जिल्हा परिषद सदस्य केशव भवर यांनी मनोगत व्यक्त केले. कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे जेष्ठ पदाधिकारी अजितशेठ लोहाडे, तुलसीदास खुबानी,बाळासाहेब कुर्लेकर, केशव भवर, गुलशन होडे, दीपक अग्रवाल, किरण शिरोडे, व्यापारी महासंघ महिला आघाडीच्या अध्यक्षा किरण दगडे, महिला आघाडीच्या इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. सोहळा यशस्वीतेसाठी व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा, सचिव प्रदीप साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापारी महासंघ आणि किराणा मर्चंट असोसिएशनचे पदाधिकारी,सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार व्यापारी महासंघाचे सचिव प्रदीप साखरे यांनी मानले.
COMMENTS