Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आधीच लॉकडाउन लावून यांनी मुंबईकरांची रोजीरोटी संपवली… भातखळकरांचे टीकास्त्र

मुंबई : प्रतिनिधी “लखीमपूर घटनेचे राजकीय भांडवल करण्याचा ढोंगीपणा हे लोक करत आहेत. आधीच लॉकडाउन लावून यांनी मुंबईकरांची रोजीरोटी संपवली. 

मराठी फलक नसल्याने 522 दुकानदारांना नोटीस
Mumbai : 10 लाखांची लाच घेतांना शाखा अभियंताला रंगेहाथ पकडले | LokNews24
रशियातील ग्रंथालयात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा; विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात संस्थेचे अभिनंदन

मुंबई : प्रतिनिधी

“लखीमपूर घटनेचे राजकीय भांडवल करण्याचा ढोंगीपणा हे लोक करत आहेत. आधीच लॉकडाउन लावून यांनी मुंबईकरांची रोजीरोटी संपवली. 

मात्र, जर कुणी पक्षीय किंवा सरकारी दडपशाही करून मुंबईकरांचे व्यवहार बंद करण्याचा प्रयत्न केला, तर भाजपा प्राणपणाने ‘महाराष्ट्र बंद’ला रस्त्यावर उतरून विरोध करेल.” असा इशारा अतुल भातखळकर यांनी सरकारला दिला आहे.

लखीमपूरखेरी प्रकरणानंतर भाजपाच्या विरोधात देश आणि राज्यातील विरोधक एकवटले आहेत. शेतकऱ्यांना चिरडून मारल्याचा निषेधार्थ उद्या ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली आहे. 

यावरून भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडीने घोषणा केलेल्या महाराष्ट्र बंदला जाहीर विरोध केला आहे. 

हे लोक लखीमपूरमध्ये झालेल्या घटनेचे राजकीय भांडवल करण्याचा ढोंगीपणा करत आहेत, असा आरोप भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केला.

COMMENTS