एव्हेर हेल्थ संचलित कोकमठाम येथील आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या महात्मा फुले जण आरोग्य योजनेचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटल चे व्यवस्थापक अमित फरताळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
कोपरगाव शहर प्रतिनिधी- एव्हेर हेल्थ संचलित कोकमठाम येथील आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या महात्मा फुले जण आरोग्य योजनेचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटल चे व्यवस्थापक अमित फरताळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. या वेळी माहिती देताना त्यांनी सांगितले की, नुकतेच हॉस्पिटल मध्ये डॉ निलेश पुरकर (ह्र्दय रोग तज्ञ ) यांनी एका ७० वर्षीय इसमाचे बायपास सर्जरी करून जीवनदान दिले आहे .सदरील व्यक्ती हि आपल्यावर उपचार करून घेण्यासाठी सुमारे ३०० कि मी अंतरावरून गंगाखेड येथून येऊन उपचारासाठी दाखल झाली . हॉस्पिटल प्रशासन व कर्मचारी यांनी योग्य ती कार्यवाही करून त्या व्यक्तीसाठी लागणारे उपचार सुरु केले व डॉक्टरांच्या अहवालानुसार बायपास सर्जरी करण्याचा निर्णय घेऊन डॉ .निलेश पुरकर व टीमने यशस्वी बायपास शास्त्रक्रिया करत त्या व्यक्तीस जिवनदान दिले, विशेष म्हणजे हि शस्त्रक्रिया महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत पूर्णपणे मोफत करण्यात आली. यावर हॉस्पिटल प्रशासनाने आवाहन केले कि महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया या मोफत केल्या जाणार असून तरी गरजू रुग्णांनी या योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन फरताळे यांनी केले आहे.
COMMENTS