नवी दिल्ली/प्रतिनिधी- देशाच्या अर्थव्यवस्थेची 1991 साली जी बिकट अवस्था होती, काहिशी तशीच स्थिती आगामी काळात निर्माण होऊ शकते. सरकारने यासाठी तयार राह
नवी दिल्ली/प्रतिनिधी- देशाच्या अर्थव्यवस्थेची 1991 साली जी बिकट अवस्था होती, काहिशी तशीच स्थिती आगामी काळात निर्माण होऊ शकते. सरकारने यासाठी तयार राहावे, असा इशारा माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी मोदी सरकारला दिला आहे. ही काही आनंदी किंवा आत्ममग्न होण्याची वेळ नाही तर ही आत्ममथन आणि विचार करण्याची वेळ आहे. 1991 च्या संकटाच्या तुलनेत पुढची वाटचाल अधिक आव्हानात्मक आहे. प्रत्येक भारतीयाला निरोगी आणि सन्मानपूर्वक आयुष्य निश्चित व्हावं यासाठी एक राष्ट्र म्हणून आपली प्राथमिकता पुन्हा एकदा निश्चित करण्याची गरज आहे, असेही डॉ. सिंग यांनी म्हटले आहे.
अर्थमंत्रीपदाची धुरा सांभाळल्यानंतर 24 जुलै, 1991 रोजी त्यांनी अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणाचा पाया घालणारा अर्थसंकल्प मांडला होता. या घटनेला आज 30 वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर डॉ. मनमोहन सिंग यांनी मत व्यक्त केले आहे. पुढील मार्ग 1991 च्या संकटाच्या तुलनेत अधिक आव्हानात्मक आहे. देशासाठी आपल्याला प्राधान्यक्रम पुन्हा ठरवण्याची गरज आहे. ते पुढे म्हणाले, ‘30 वर्षांपूर्वी काँग्रेसने भारताच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाच्या सुधारणांची सुरूवात केली होती. पक्षाने देशाच्या आर्थिक धोरणांसाठी एक नवा मार्ग तयार केला होता. गेल्या तीन दशकांत आलेल्या विविध पक्षांच्या सरकारचा अजेंडा तोच राहिला. त्यामुळे आपल्या देशाची गणना जगाच्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेत केली जाते. सुधारणांसाठी ज्या काही गोष्टी केल्या त्यात माझ्या सहकार्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळाली याचा मला आनंद आहे. गेल्या तीन दशकांतील आर्थिक प्रगती पाहून मला अभिमान वाटतो. या कालावधीत 30 कोटी भारतीय नागरिक गरीबीतून बाहेर आहे. कोट्यवधी नोकर्याही निर्माण झाल्या. मी भाग्यवान आहे की मला काँग्रेसमधील अनेक सहकार्यांसह सुधारणांच्या या प्रक्रियेत माझी भूमिका पार पाडता आली. गेल्या तीन दशकात आपल्या देशाने जबरदस्त आर्थिक प्रगती केली आहे याचा मला आनंद आणि अभिमान वाटतो. पण कोविडमुळे झालेला विध्वंस आणि कोट्यावधी लोकांनी नोकरी गमावल्यामुळे मी दु:खी आहे. आरोग्य आणि शिक्षण ही क्षेत्रे मागे पडली आहेत आणि आपल्या आर्थिक प्रगतीच्या गतीने ते पुढे आली नाहीत. म्हणून बर्याच जणांचे प्राण गेले आणि ते व्हायला नव्हतं व्हायला हवं. ‘ही आनंदी आणि मग्न होण्याची वेळ नाही तर आत्मनिरीक्षण आणि चिंतन करण्याची वेळ आहे. 1991 च्या संकटाच्या तुलनेत आताचा पुढचा रस्ता अधिक आव्हानात्मक आहे. एक देश म्हणून आपल्याला आपला प्राधान्यक्रम पुन्हा एकदा निश्चित करण्याची गरज आहे. यामुळे प्रत्येक भारतीयाला आरोग्य आणि सन्मानजनक जीवन जगात येईल, मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे.
प्राधान्यक्रम निश्चित करण्याची गरज
देशासमोरील आव्हानांचा विचार करता, आगामी काळात आपल्याला प्राधान्यक्रम निश्चित करावा लागणार आहे. कोरोना संक्रमणामुळे शिक्षण, आरोग्य या क्षेत्रात झालेली पिछेहाट दुःखदायक आहे. हे विभाग आपल्या आर्थिक प्रगतीच्या दिशेने चालु शकले नाहीत. बेरोजगारी मोठया प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे आव्हानेे मोठी असली तरी त्याचा सामना करण्यासाठी प्राधान्यक्रम निश्चित करण्याची गरज माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी व्यक्त केली.
COMMENTS