कोविड-19 चा उगम हा चीनमधून झाला असून, त्याच्या प्रसारात चीनचे राष्ट्राध्यक्ष जबाबदार असल्याचा आरोप करून, त्याविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालय हेग येथे याचिका दाखल करणारे अॅड.
अहमदनगर : कोविड-19 चा उगम हा चीनमधून झाला असून, त्याच्या प्रसारात चीनचे राष्ट्राध्यक्ष जबाबदार असल्याचा आरोप करून, त्याविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालय हेग येथे याचिका दाखल करणारे अॅड. रावसाहेब अनर्थे यांची गिनीज बुकात नोंद करण्यात आली आहे.
अॅड. अनर्थे हे मुळचे राहता तालुक्यातील चिंचपूर-चंद्रपूर येथील असून, ते सध्या पुणे येथे वास्तव्यास आहेत. कोविडमुळे सलग दुसर्या वर्षी भारतात कोरोनाचे सावट असून रुग्ण संख्या विक्रमी वाढत आहे. चीनच्या अध्यक्षांनी कोरोना विषाणूंचा जैविक हत्यार म्हणून वापर केल्याने संपूर्ण जगात नरसंहार झाला असा आरोप करून अँड रावसाहेब अनर्थे यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात केस दाखल केल्याने त्यांच्या कार्याची दखल गिनीज बुक ने घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयात वकिली करणारे अॅड. रावसाहेब अनर्थे यांनी अंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय हेग नेदरलँड येथे चीनच्या अध्यक्षाविरोधात कोविड-19 चा वापर जैविक हत्यार म्हणून करत जगात नरसंहार केला. त्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल केला होता. तो न्यायालयाने जढझ-उठ छज.246/2020 दाखल करून घेत पुढील कार्यवाही सुरू केली आहे. सदरील दावा संपूर्ण जगाच्या वतीने दाखल करणारे अॅड रावसाहेब अनर्थे जगातील एकमेव वकील आहे, म्हणून त्यांचे या कार्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ने दखल घेत त्यांचे नावे सदरील विश्व विक्रमाची नोंद झाली. अशा विक्रमाची नोंद करणारे ते जगातील एकमेव वकील आहेत. त्यांच्या या धाडसी कार्याचे सर्व स्तरातुन अभिनंदन आणि कौतुक होत आहे.
COMMENTS