अहमदनगर शहरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या कामास सुरुवात : आमदार संग्राम जगताप

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगर शहरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या कामास सुरुवात : आमदार संग्राम जगताप

अहमदनगर:  प्रतिनिधी पूर्वी नगर शहरामध्ये विकासाचे प्रश्न सोडवण्याऐवजी आंदोलने करण्याकडे विशेष लक्ष असायचे. शासनाचा निधी आला की त्या कामांमध्ये आडक

Ahmednagar : अहमदनगर शहरात लागणार स्मार्ट एलईडी दिवे (Video)
अहमदनगरच्या जिल्हा नामातरांचा निर्णय आजच्या बैठकीत घ्या
पुस्तकरुपी असलेले ज्ञान समाजाला दिशा देतात -आ. संग्राम जगताप

अहमदनगर:  प्रतिनिधी

पूर्वी नगर शहरामध्ये विकासाचे प्रश्न सोडवण्याऐवजी आंदोलने करण्याकडे विशेष लक्ष असायचे. शासनाचा निधी आला की त्या कामांमध्ये आडकाठी आणायची त्यामुळे आलेला निधी परत शासन दरबारी जायचं. त्यामुळे शहरामध्ये प्रलंबित, मूलभूत प्रश्नापासून कामे करावी लागत आहे. पुढील चाळीस वर्षांचा विचार करून विकासाचे नियोजन पूर्वक काम सुरू आहेत. जमिनीअंतर्गत सर्व कामे होणे गरजेचे आहे. जेणेकरून पुन्हा पुन्हा रस्ते खोदण्याची गरज पडणार नाही उपमहापौर गणेश भोसले यांच्या कामाचा नियोजनबद्ध विकास कामाचा प्रोजेक्ट शहरामध्ये राबवला जाणार आहे. प्रभाग क्रमांक 14 मधील कोहिनूर अपार्टमेन्ट परिसरामध्ये रस्ता कॉंक्रिटीकरण कामाला सुरुवात करून शहराच्या खड्डामुक्ती साठी कॉंक्रिटीकरण रस्त्यांच्या कामाना सुरुवात केली आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

उपमहापौर गणेश भोसले यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 14 मध्ये एके 1 अपारमेंट परिसरातील रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी नगरसेवक प्रकाश भागानगरे,रंणजीत पोखरणा, राजेंद्र प्रसाद सिकंची, रमेश बाफना, सुभाष भंडारी, रमेश बोरा, रामदास खैरे, रामदास वामन, राजेंद्र ओस्तवाल, उद्यानकुमार झंवर,पप्पन तलरेजा, आदी उपस्थित होते.

आमदार संग्राम जगताप पुढे म्हणाले की शहरांमध्ये वर्षभर आंदोलने व मोर्चे केली जात होती. नवरात्र मध्ये केडगाव देवी रोडवर व पावसाळ्यात शहरात खड्ड्यात उभे राहून आंदोलन व मोर्चे करीत असायचे आम्ही देवी रोड च्या प्रश्न मार्गे लावल्यामुळे आंदोलने बंद झाली. आता शहरातील रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावले नंतर ही आंदोलने बंद होतील. आता शहरांमध्ये विविध कॉंक्रिटीकरण व डांबरीकरणाचे रस्ते मंजूर आहे ही कामे आता सुरू झाली असल्यामुळे या कामामुळे शहरातील खड्डेमुक्त रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असलेचे ते म्हणाले.

उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की नियोजनबद्ध विकास कामे केल्यानंतर रस्त्याचे कामे पुन्हा पुन्हा करण्याची वेळ आपल्यावर येत नाही. या दृष्टिकोनातून आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्व खाली. रस्त्यांच्या कामांना सुरुवात केली आहे. शहरातील नागरिकांचे कायमस्वरूपी एक एक प्रश्न आमदार संग्राम जगताप व अहमदनगर महानगर पालिकेच्या माध्यमातून आम्ही मार्गी लावणार आहे. आज एके 1 अपार्टमेन्ट परिसरामधील आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून रस्ता कॉंक्रिटीकरणच्या काम सुरु झाली आहे. शहरातली विविध रस्त्यांची कामे पावसाळ्यानंतर नियोजनबद्ध सुरु होऊन पुढील दोन वर्षात सर्व विकास कामे मार्गी लावू असे ते म्हणाले.

COMMENTS