अहमदनगर ब्रेकिंग : अण्णासाहेब शेलार यांचे ‘नागवडे’चे संचालकपद रद्द

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगर ब्रेकिंग : अण्णासाहेब शेलार यांचे ‘नागवडे’चे संचालकपद रद्द

श्रीगोंदा,दि.९प्रतिनिधी) - कारखान्याच्या संचालक मंडळाच्या सलग तीन बैठकांना गैरहजर राहिल्याने नागवडे सहकारी साखर कारखान्याचे संचालक अण्णासाहेब शेला

सोळाशे कोटी रुपयांचे बेकायदा दगड उत्खनन? : राज्यपालांकडे गायके यांची तक्रार
पहिल्या पत्नीस फसवून केले चक्क आणखी दोन विवाह..
दुष्काळ सदृश्य परिस्तिथीमुळे आ.आजबेंचा वाढदिवस साध्या पध्दतीने साजरा

श्रीगोंदा,दि.९प्रतिनिधी) –

कारखान्याच्या संचालक मंडळाच्या सलग तीन बैठकांना गैरहजर राहिल्याने नागवडे सहकारी साखर कारखान्याचे संचालक अण्णासाहेब शेलार यांचे संचालकपद रद्द करण्यात आले आहे. सभासदांनी केलेल्या तक्रारीवरून साखर सहसंचालक मिलिंद भालेराव यांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान, कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केशवराव मगर यांच्याविरुध्दची तक्रार मात्र अमान्य करण्यात आली. 

याबाबत सविस्तर असे की, ‘नागवडे’चे संचालक केशवराव मगर व अण्णासाहेब शेलार हे कारखान्याच्या संचालक मंडळाच्या सलग तीन बैठकांना गैरहजर राहिल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी कारखान्याचे सभासद नितीन वाबळे व साहेबराव महारनूर यांनी साखर सहसंचालक यांच्याकडे केली होती. याबाबतचा निर्णय काही दिवस लांबणीवर पडला होता. मात्र, अखेर झालेल्या सुनावणीत शेलार हे ते बैठकांना का गैरहजर राहिले हे पटवून देवू शकले नाहीत. मात्र मगर यांनी मात्र ते कारण पटवून दिल्याने त्यांच्यावरची कारवाई टळली. 

याबाबत साखर सहसंचालक मिलिंद भालेराव यांनी अण्णासाहेब शेलार यांच्याविरोधातील याचिका मान्य करीत शेलार यांचे कारखान्याचे संचालकपद रद्द केले. परिणामी, शेलार यांना पुढील सहा वर्षे कोणत्याही सहकारी संस्थेची निवडणूक लढविता येणार नाही. दरम्यान, शेलार यांनी या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी चालवली आहे.

COMMENTS