अहमदनगर प्रधान डाकघराच्या प्रभारी सिनियर पोस्टमास्तरपदी श्री संदीप कोकाटे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगर प्रधान डाकघराच्या प्रभारी सिनियर पोस्टमास्तरपदी श्री संदीप कोकाटे

अहमदनगर :   प्रधान डाकघर अहमदनगराच्या प्रभारी सिनियर पोस्टमास्तरपदी आज श्री संदीप कोकाटे यांनी पदभार स्वीकारला. श्री संदीप कोकाटे यांनी यापूर्व

शेकडो युवक कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी अहोरात्र काम करणार
विजयादशमीला महापालिकेचे ढब्बू मकात्या महापालिका नामांतर करण्याचा निर्णय

अहमदनगर :  

प्रधान डाकघर अहमदनगराच्या प्रभारी सिनियर पोस्टमास्तरपदी आज श्री संदीप कोकाटे यांनी पदभार स्वीकारला.

श्री संदीप कोकाटे यांनी यापूर्वी बीड, रत्नागिरी तर अहमदनगर विभागात श्रीगोंदा ,आनंदीबाजार व अहमदनगर सिटी पोस्ट ऑफिस याठिकाणी सब पोस्टमास्तर म्हणून काम पाहिलेले आहे. त्याची एक कुशल प्रशासक व कामगार प्रिय म्हणून ओळख आहे.

प्रधान डाकघराचे पोस्टमास्तर हे पद मागील काही काळापासून रिक्त असून यापदी प्रभारीपदी अगोदर श्री गोरख दहिवाळकर श्री महेश तामटे यानी काम पाहिले आहे.

आज पोस्टमास्तर म्हणून श्री संदीप कोकाटे यांनी कार्यभार स्वीकारला,त्यानिमित्ताने नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईजचे राज्य उपाध्यक्ष श्री संतोष यादव यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी श्री  शिवाजी जावळे, श्री बापू तांबे,श्री प्रकाश कदम,श्री सागर पंचारिया, श्री कमलेश मिरगणे,श्री नितिन थोरवे,श्री तान्हाजी सूर्यवंशी श्रीमती हिरा मगर,श्रीमती आश्विनी चिंतामणी,श्री अनिल धनावत, श्री सूर्यकांत श्रीमंदीलकर,श्री अंबादास सुद्रीक,श्री विजय चाबुकस्वार यांचे सह मोठ्या संख्येने डाक कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS