नगर - राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने या विकास आघाडीच्या माध्यमातून जनतेचे कामे होत आहेत. तीच परंपरा आम्ही नगरमध्येही सुरु ठेवून महाविकास
नगर –
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने या विकास आघाडीच्या माध्यमातून जनतेचे कामे होत आहेत. तीच परंपरा आम्ही नगरमध्येही सुरु ठेवून महाविकास आघाडीचा महापौर, उपमहापौर, महिला बाल कल्याण समितीच्या पदावर आघाडीतील पक्षांना स्थान देऊन समन्वयातून निवडी केल्या आहेत. ही महाविकास आघाडी विकासासाठी कायम एकत्र राहणार असून, त्या माध्यमातून नगरच्या विकासाला चालना देण्याचे काम या माध्यमातून होणार आहे. सर्वांना बरोबर घेऊन नगरचे प्रश्न आपणास मार्गी लावयाचे असून, अशा एकत्रित प्रयत्नातून राज्य सरकारकडून नगरच्या प्रलंबित प्रश्नांसाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचा आपले प्रयत्न राहतील. महिला बाल कल्याण समितीच्या सभापती सौ.पुष्पाताई बोरुडे व उपसभापती मीनाताई चोपडा यांनी आपल्या प्रभागात चांगली कामे केली आहेत. आता या पदाच्या माध्यमातून नगर शहराच्या विकासात योगदान देतील, यात शंका नाही. त्यासाठी आपले सर्वोतोपरि सहकार्य राहील, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती सौ.पुष्पा बोरुडे व उपसभापती सौ.मीना चोपडा यांनी आज आमदार संग्राम जगताप व महापौर सौ.रोहिणी शेंडगे यांच्या उपस्थितीत पदभार स्विकारला. याप्रसंगी उपमहापौर गणेश भोसले, स्थायी समिती सभापती अविनाश घुले, ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे, माजी महापौर सुरेखा कदम, भगवान फुलसौंदर, संजय शेंडगे, अनिल बोरुडे, संजय चोपडा आदिंसह महाविकास आघाडीचे नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी महापौर सौ.रोहिणी शेंडगे म्हणाल्या, नगर विकासाचे स्वप्न बाळगून महाविकास आघाडीचे पदाधिकारी काम करत आहेत. महाविकास आघाडी मनपाच्या माध्यमातून जनतेचे कामे करण्यास कटीबद्ध राहील. नूतन सभापती सौ.बोरुडे व उपसभापती सौ.चोपडा यांच्या कार्यास आपलेही सहकार्य राहील, असे सांगितले.
पदभार घेतल्यानंतर सभापती सौ.पुष्पा बोरुडे म्हणाल्या, सर्वांच्या सहकार्याने आपली या पदावर नियुक्ती झाली आहे, असेच सहकार्य यापुढे सर्वांचे राहिल. त्या माध्यमातून नगरच्या नागरिकांनाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटीबद्ध राहू, असे सांगितले.
सौ.मीना चोपडा म्हणाले, प्रभागातील कामांबरोबरच आता नगरमधील महिला व बालकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन ते सोडविण्याचा आपला प्रयत्न राहील. आ.संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले काम करु, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे,नगरसेवक कुमार वाकळे, संभाजी कदम, प्रकाश भागानगरे, सुवर्णा जाधव, संपत बारस्कर, विनित पाउलबुधे, सुभाष लोंढे, संजय ढोणे,निखिल वारे, शाम नळकांडे, सचिन शिंदे, प्रशांत गायकवाड, मंगल लोखंडे, अजिंक्य बोरकर, प्रा.माणिक विधाते, रेश्मा आठरे, आशा निंबाळकर, अरुण गोयल, योगीराज गाडे, मदन आढाव, कमल सप्रे, दिपाली बारस्कर, सुवर्णा गेनप्पा आदि उपस्थित होते.
COMMENTS