असंख्य कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात दाखल; प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत मुंबईत सोहळा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

असंख्य कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात दाखल; प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत मुंबईत सोहळा

परभणी,दि.12(प्रतिनिधी) :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते विजय वरपूडकर यांनी मंगळवारी (दि.12) दुपारी मुंबईतील प्रद

Parbhani : मॉर्निंग वॉक करणाऱ्या चार नागरिकांना ट्रकने चिरडले…
आयपीएलवर सट्टा लावणार्या सट्टेबाजांवर सेलूत छापा; चार आरोपींविरुध्द गुन्हा दाखल
परभणीला कोरोनाच्या तिसर्‍या लाटेपासून दूर ठेवण्यास प्रशासन प्रयत्नशील – जिल्हाधिकारी आंचल गोयल

परभणी,दि.12(प्रतिनिधी) : 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते विजय वरपूडकर यांनी मंगळवारी (दि.12) दुपारी मुंबईतील प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या सोहळ्यात भारतीय जनता पक्षात असंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील हे उपस्थित होते.

      भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते रामप्रसाद बोर्डीकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, माजी आमदार मोहन फड, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रमोद वाकोडकर हे यावेळी उपस्थित होते.

      या सोहळ्यात ज्येष्ठ नेते वरपुडकर, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. विलास देशपांडे, माजी नगराध्यक्ष कमलकिशोर अग्रवाल, माजी पंचायत समिती सभापती सूरेश गिरी, हनुमानदास वैष्णव, सुभाष देशमुख, उत्कर्ष विजय वरपुडकर, माणिकराव भोसले, निवृत्ती पाटील काळबांडे, मधुकर मोहिते, शंकर मोरे, अंबादासराव कदम, नामदेवराव डुबे, रामदास डुबे, श्रीनिवास देशमुख, सुभाष यादव, राधाकिशन कदम, केशव थोरवट, दत्तात्रय देशमुख, आनंद देशमुख, संग्राम हेडगे, भानुदास राखुंडे, बाबासाहेब रनेर, सुभाष गरुड, गोविंद डुकरे, शाम काकानी, रणजित बिसाड व गौरव हरजुबे या आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

      दरम्यान, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वरपुडकर यांच्यासह या सर्वांचे पुष्पगुच्छ देवून स्वागतकेले. परभणी जिल्हा भक्कमपणे उभा राहील, असा विश्‍वास व्यक्त केला. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व महानगरपालिकांच्या निवडणूकांतून सर्व नेते मंडळी व कार्यकर्त्यांनी एकजूटीने काम करीत भक्कम असे यश पदरात पाडून घ्यावे, असे आवाहनही केले. दरम्यान, जिल्ह्यातील नेतेमंडळींनी वरपुडकर यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. त्यांच्या या प्रवेशाने निश्‍चितच संघटनेस मोठा उपयोग होईल, असा विश्‍वासही व्यक्त केला आहे.

COMMENTS