अविकासाच्या अपप्रवृत्तींचा नाशासाठी खड्डे रूपी रावणाचे दहन

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

अविकासाच्या अपप्रवृत्तींचा नाशासाठी खड्डे रूपी रावणाचे दहन

नगर – नगर शहरात सर्व रस्त्यांची झालेली दुर्दशा दूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाला जाग यावी यासाठी गौरीशंकर मित्रमंडळाच्या वतीने खड्डे रूपी रावणाचे द

अ‍ॅड. डॉ. अरुण जाधव यांना दादा कोंडके समाज भूषण पुरस्कार
वळणमध्ये शाळेनेच दिला गणवेशाला नकार
रुग्णांसाठी न्यू लाईफ हॉस्पिटल संजीवनी ठरणार : आ. प्रा. राम शिंदे

नगर – नगर शहरात सर्व रस्त्यांची झालेली दुर्दशा दूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाला जाग यावी यासाठी गौरीशंकर मित्रमंडळाच्या वतीने खड्डे रूपी रावणाचे दहन केले आहे. गौरीशंकर मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विजयादशमीला दहन करण्यासाठी बनवलेल्या रावणाच्या अंगावर शहरातील विविध भागातील रस्त्यांच्या खड्यांचे फोटो लावण्यात आले होते. या खड्डेरूपी रावणाचे दहन जेष्ठ नेते वसंत लोढा यांच्या हस्ते झाले. वसंत लोढा म्हणाले, आपल्या नगर शहरातील अविकासाच्या अपप्रवृती वाढत आहेत. या रावणा सारख्या अपप्रवृत्तींचा नाश व्हावा यासाठी खड्डे रूपी रावणाचे दहन यावर्षी आम्ही केले आहे. खड्डेमय रस्त्यांनी त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देत रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम आता तरी महापालिका प्रशासनाने हाती घ्यावे.  

COMMENTS