अभिनेता अक्षय कुमारच्या आईचे निधन… ट्विट करत दिली माहिती

Homeताज्या बातम्यादेश

अभिनेता अक्षय कुमारच्या आईचे निधन… ट्विट करत दिली माहिती

वेब टीम : मुंबईबॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून अरुणा यांची प्रकृती चिंताजनक होती

दर्शल सोळंकी आत्महत्येप्रकरणी अरमान खत्रीला अटक
छ. संभाजीनगर मध्ये मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी
दुचाकी मध्ये पेट्रोल भरताना दुचाकीने घेतला पेट.

वेब टीम : मुंबई
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून अरुणा यांची प्रकृती चिंताजनक होती . मुंबईच्या हिरानंदानी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते .

मात्र आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला . यासंदर्भात खुद्द अक्षय कुमारने ट्विट करत माहिती दिली . आईची तब्येत बिघडल्यानंतर अक्षय कुमार लंडनहून शूटिंग सोडून मुंबईलाही परतला आहे .

ती माझा आधार होती आणि आज मला असह्य दु:ख होत आहे. माझी आई अरुणा भाटिया यांनी आज सकाळी जगाचा निरोप घेतला आणि दुस-या जगात तिची वडिलांशी पुनर्भेट झाली.

या दु:खप्रसंगी तुम्ही केलेल्या प्रार्थनांचा मी आदर करतो. ओम शांती,’ अशा शब्दात अक्षयने आपले दुःख व्यक्त केले.

याअगोदरही अक्षयने माझ्या आईसाठी प्रार्थना करा, अशी भावुक पोस्टही त्याने शेअर केली होती. तुमच्या प्रार्थनांची गरज आहे.

प्रत्येक तास माझ्यासाठी कठीण आहे, असे तो म्हणाला होता . मात्र आज त्याच्या आईचे निधन झाले .

COMMENTS