अपंग व्यक्तीला आधार देत दिवाळी केली गोड

Homeअहमदनगर

अपंग व्यक्तीला आधार देत दिवाळी केली गोड

खरवंडी कासार/प्रतिनिधी : पाथर्डी तालुक्यातील मालेवाडी गावातील नारायण सानप या अपंग व्यक्तीला वंधत्व प्राप्त झाल्याने फरपटत चालावे लागत होते, नारायण सा

पोलिसातील वाघ अखेर पोलिसांच्याच पिंजर्‍यात…; अत्याचाराच्या गुन्ह्यात निलंबित पोलिस निरीक्षक वाघला पोलिस कोठडी
मालिकांच्या राजीनाम्यासाठी अहमदनगरमध्ये भाजपचे आंदोलन | LOKNews24
डॉ. शेळके आत्महत्याप्रकरणी दोषींवर कारवाई करा : टोपे

खरवंडी कासार/प्रतिनिधी : पाथर्डी तालुक्यातील मालेवाडी गावातील नारायण सानप या अपंग व्यक्तीला वंधत्व प्राप्त झाल्याने फरपटत चालावे लागत होते, नारायण सानप हे मेंढी पालन व्यवसाय करायचे, परंतु वाढत्या वयानुसार त्यांना वंधत्व प्राप्त झाल्याने शरीराने आणि मनाने खचलेल्या नारायण सानप यांना फरफटत चालत असल्याचे गावातील शिक्षकांनी पाहिल्याने सामाजिक उत्तरदायित्व लक्षात घेऊन नारायण सानप यांना व्हील चेअर  उपलब्ध करून दिली यामुळे मालेवाडी गावातील शिक्षकांनी नारायण सानप यांची दिवाळी गोड केली आहे,या उपक्रमासाठी डॉक्टर संदीप कराड यांनी मार्गदर्शन करत विशेष सहकार्य केले आहे या उपक्रमासाठी ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत शिक्षक सुधीर दराडे, अंबादास खेडकर, बाबासाहेब खेडकर, संतोष खेडकर व युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस व प्रा दादासाहेब खेडकर यांनी स्व-खर्च वर्गणी जमा करत नारायण सानप यांना व्हील चेअर उपलब्ध करून दिल्याने भगवानगड परिसरातील नागरिकांमधून कौतुक होत आहे, दिवाळीच्या शुभमुहूर्तावर मालेवाडी गावामध्ये नारायण सानप यांना व्हीलचेअर देण्यात आली,यावेळी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन वामन किर्तने, सरकारी विधिज्ञ शिवाजी दराडे, माजी सरपंच विठ्ठल दराडे, आप्पा कीर्तने, कांता टाकसाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS