अनिल देशमुखांची ईडीच्या कोठडीत रवानगी; न्यायालयीन कोठडीचा निर्णय उच्च न्यायालयाकडून रद्द

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अनिल देशमुखांची ईडीच्या कोठडीत रवानगी; न्यायालयीन कोठडीचा निर्णय उच्च न्यायालयाकडून रद्द

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख बर्‍याच दिवसानंतर ईडीच्या कार्यालयात हजर झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. तसेच न्यायालयाने त्यांन

स्नेहसंमेलनामधून मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो ः अनिता उगले
बुलढाण्यातील 259 ग्रामपंचायतीचा 80.47 टक्के मतदान
नगरच्या सनफार्मा कंपनीत आग लागून कामगाराचा मृत्यू

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख बर्‍याच दिवसानंतर ईडीच्या कार्यालयात हजर झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. तसेच न्यायालयाने त्यांना 06 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. 06 नोव्हेंबर रोजी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. याविरोधात ईडीने उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द करत देशमुखांची 14 दिवसांसाठी ईडीच्या कोठडीत रवानगी केली.
देशमुख यांना आर्थर रोड तुरुंगातून पुन्हा एकदा ईडी कोठडीत जावे लागणार आहे.उ च्च न्यायालयाच्या निर्णयाने देशमुख निराश झाले आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणात 12 तासांहून अधिक काळ चौकशी केल्यानंतर देशमुख (71) यांना ईडीने 1 नोव्हेंबर रोजी अटक केली होती. माजी मंत्र्याने या प्रकरणात ईडीने जारी केलेले अनेक समन्स वगळले होते परंतु गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्याने ते सोमवारी एजन्सीसमोर हजर झाले. येथील विशेष सुटी न्यायालयाने मंगळवारी त्याला 6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आता सीबीआयही देशमुख यांच्या कोठडीची मागणी करणार आहे.तपास यंत्रणेने एप्रिलमध्ये अनिल देशमुख यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता.त्याचबरोबर देशमुख यांनी राज्याचे गृहमंत्री असताना आपल्या अधिकृत पदाचा गैरवापर केल्याचा आरोप ईडीने केला आहे. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाजे यांच्यामार्फत मुंबईतील विविध बार आणि रेस्टॉरंटमधून 4.70 कोटींहून अधिक रक्कम गोळा करण्यात आली.

COMMENTS