Homeमहाराष्ट्र

अनधिकृत उत्खनन केल्याप्रकरणी ठेकेदारास शिराळा तहसीलदार यांचे नोटीस

खुजगांव, ता. शिराळा येथे परवानगी पेक्षा जास्त अनधिकृत उत्खनन केल्या प्रकरणी वाठार, ता.

यंदा रायगडी घुमणार राजधानीचा आवाज; राज्यभिषेक कलशाचे विधीवत पूजनास शिवभक्तांची उपस्थिती
मोटारसायकल चोरांचा पोलिसांना पुन्हा झटका
ट्रिपल मर्डर ! घरात आईचा खून तर दोन मुलांना विहिरीत ढकललं| LOK News 24

शिराळा / प्रतिनिधी : खुजगांव, ता. शिराळा येथे परवानगी पेक्षा जास्त अनधिकृत उत्खनन केल्या प्रकरणी वाठार, ता. कराड येथील ठेकेदारावर शिराळा तहसीलदारांनी कारवाई का करण्यात येवु नये, अशी नोटीस बजावली. मात्र, कारवाई उशिरा केल्याने तक्रारदार किरण सावंत शिवसेना युवासेना विस्तारक यांनी नाराजी व्यक्त केली असून जिल्हाधिकारी आणि मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणार आहेत.                                             

सद्या शिराळा तालुक्यात कराड-कोकरुड आणि शिराळा कोकरुड अशा दोन राज्य मार्गाची रुंदीकरणाची कामे सुरु असून कराड-कोकरूड या मार्गासाठी पाचशे ब्रास उत्खननास प्रशासनाने परवानगी दिली होती. मात्र, या कामाच्या ठेकेदाराने मेणी, येळापुर, खुजगांव या गावाच्या परिसरात तब्बल पाच लाख ब्रासपेक्षा जास्त उत्खनन करुन मुरुम काढला असल्याची तक्रार खुजगांव येथील रहिवाशी व युवासेना राज्य विस्तारक किरण सावंत यांनी निवेदनाद्वारे शिराळा तहसीलदार यांच्याकडे केली होती. तक्रारीची दखल घेत तहसीलदार गणेश शिंदे यांनी उत्खनन केलेल्या ठिकाणी भेट देऊन कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्याप्रमाणे तहसीलदार गणेश शिंदे यांनी 31 मार्चला वाठार, ता. कराड येथील गणेश मारुती माने यांना परवानगीपेक्षा जास्त अनधिकृत उत्खनन करुन मुरुम काढल्याने आपल्यावर का कारवाई करण्यात येऊ नये. अशी नोटीस बजावली आहे. मात्र, ठेकेदारावर पंचनामा करुन तत्काळ कारवाई न करता फक्त तुमच्यावर कारवाई का करु नये, अशी नोटीस उशिरा काढल्याने किरण सावंत यांनी नाराजी व्यक्त केली असुन जिल्हाधिकारी आणि मंत्री यांच्यापर्यंत ठेकेदाराविरुध्द पाठपुरावा करणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.

COMMENTS