अनकई डोंगरावरील वानरांची उपासमार

Homeताज्या बातम्या

अनकई डोंगरावरील वानरांची उपासमार

वन्यजीव प्रेमींकडून मदतीचे आवाहन

अहमदनगर/प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात असलेल्या व मनमाड जवळील अनकई किल्ल्यावरील वानरांची उपासमार सुरू असल्याने वन्यजीव प्रेमींकडून मदत

राज्यात लम्पीने 32 जनावरांचा मृत्यू : मंत्री विखे
उत्तराखंडच्या चार धाम यात्रेला सुरूवात
कलियुगात पुण्यकर्मच महत्वाचे ः परमानंदगिरी महाराज

अहमदनगर/प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात असलेल्या व मनमाड जवळील अनकई किल्ल्यावरील वानरांची उपासमार सुरू असल्याने वन्यजीव प्रेमींकडून मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. ॥भुखे को अन्न प्यासे को पाणी ॥ या मोहिमेंतर्गत सोशल मिडियातून या मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. शिर्डी येथील कमलाकर कोते यांनी याबाबत सांगितले की, माझ्या घरी अनकई किल्ला (ता.येवला जि.नाशिक) येथील अगस्ती ऋषी आश्रमाचे महंत लालबाबा आले होते. त्यांच्या सोबत चर्चा करीत असताना अनकई डोंगरावरील वानरांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. प्रचंड उन्हाचा तडाखा व डोंगरावर तुरळक झाडे यामुळे वानरांना खायला काही नाही. सर्व झाडाचा पालासुध्दा वानरानी खाऊन टाकला आहे. परिसरात खाण्यायोग्य काही शिल्लक नाही. त्यामुळे या मुक्या प्राण्यांची उपासमार होत आहे. शिर्डीकरांनी यापूर्वी हरभरा, शेंगदाणे, फुटाणे देऊन मदत केली होती. आत्ता आणखी दोन महिने मोठी गरज असून काही शक्य असेल तर सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. या डोंगरावर पाण्याच्या टाक्या आहे, पण अन्न नाही. त्यामुळे या वानरांच्या अन्नासाठी आर्थिक मदत देऊ इच्छिणारांनी कमलाकर कोते शिर्डी 8308654116 व अमोल महाले (फोन पे, गुगल पे नंबर-9922355000) यांच्याशी संपर्क साधावा

COMMENTS