अखेर मुलीला शाळेत सोडणे राहूनच गेले…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेर मुलीला शाळेत सोडणे राहूनच गेले…

ट्रकच्या धडकेमध्ये बाप-लेकीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू मन हेलावून टाकणारी घटना पुणे जिल्ह्यातील सासवड येथे घडली.

सासवड प्रतिनिधी- मुलीला शाळेत सोडण्यासाठी जात असताना अचानक ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात वडिलांचा मृत्यू झाला आहे. तर मुलीला हॉस्पिटलमध्ये न

मोठी दुर्घटना ! ‘भगत की कोठी’ ट्रेनची मालगाडीला मागून धडक.
भरधाव कार ट्रकवर आदळून दोन जण ठार
भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

सासवड प्रतिनिधी- मुलीला शाळेत सोडण्यासाठी जात असताना अचानक ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात वडिलांचा मृत्यू झाला आहे. तर मुलीला हॉस्पिटलमध्ये नेत असताना तिचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना पुणे(Pune) जिल्ह्यातील सासवड इथं घडली आहे. बाप-लेकीच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.  हडपसर येथील सासवड रोडवर सकाळी सात वाजेच्या सुमारास ग्लायडिंग सेंटर(Gliding Center) समोर सातववाडी(Satavwadi) इथं ही घटना घडली. निलेश साळुंखे(Nilesh Salunkhe) (वय 35, रा. ढमाळवाडी, फुरसुंगी)(Dhamalwadi, Fursungi) आणि मीनाक्षी साळुंखे(Meenakshi Salunkhe) (वय 10) अशी अपघातात मृत्यू झालेल्या वडील आणि मुलीचे नावे आहेत.

COMMENTS