अखेर ठरलं… ‘या’ तारखेला शाळा उघडणार… राज्य सरकारचा निर्णय

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेर ठरलं… ‘या’ तारखेला शाळा उघडणार… राज्य सरकारचा निर्णय

प्रतिनिधी : मुंबई राज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात ऑगस्ट महिन्यात एकदा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी तो निर्णय स्थगित करण्यात आल

पंतप्रधान मोदींसह राहुल गांधींना नोटीस
ओबीसी आरक्षणासाठी भुजबळांचा शड्डू
शरद पवारला तिघांची शिवीगाळ व मारहाण | DAINIK LOKMNTHAN

प्रतिनिधी : मुंबई

राज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात ऑगस्ट महिन्यात एकदा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी तो निर्णय स्थगित करण्यात आला होता. 

आता मात्र मुख्यमंत्र्यांनी कोरोनाचे नियमांचं पालन करुन शाळा सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. गेल्या वर्षीपासून शाळा बंद होत्या. 

कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यानं शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बहुतांश ठिकाणी लसीकरण झालं आहे.

शिक्षक आणि शालेय कर्मचारी यांचं लसीकरण झालेलं आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. 

दरम्यान, शाळा सुरू करण्याला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली असली तरी, जिल्ह्याची परिस्थिती पाहून शाळा सुरु केल्या जातील. 

बऱ्याच जिल्ह्यात वातावरण चांगलं आहे. कोरोना संपल्यात जमा आहे. पुन्हा कोरोना रुग्ण वाढले तर शाळा सुरु किंवा बंद करण्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार राहतील, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.

राज्यात कोरोनाचे संकट आल्यापासून बंद असलेल्या शाळा सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

 त्यांनी राज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाने पाठवलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या मंजुरीनुसार आता,

४ ऑक्टोबरपासून कोरोना नियमांचं पालन करुन शाळा सुरु होतील. मात्र, कुठले वर्ग सुरू करण्यात येणार याबाबत अद्याप निश्चित माहिती मिळू शकलेली नाही.

COMMENTS