Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अकोल्यात अतिक्रमणप्रकरणी समशेरपूरचे ग्रामपंचायत सदस्य अपात्र

अकोले : अकोले तालुक्यातील समशेरपूर ग्रामपंचायतीच्या माया भरीतकर व जनाबाई साळवे या दोन सदस्यांना अतिक्रमणप्रकरणी अपात्र ठरविल्याचा निर्णय जिल्हाधि

लातूर जिल्ह्यातील चौघींना जीवदान
नियमबाह्य रीतीने चालविण्यात येत असलेले  दारूचे दुकान तात्काळ बंद करा
लातूर ग्रामीणमधील रस्त्यांचे चित्र पालटणार
ग्रामपंचायत सदस्यांना अतिक्रमण भोवले : सरपंचासह चार सदस्य अपात्र - Breaking  Maharashtra

अकोले : अकोले तालुक्यातील समशेरपूर ग्रामपंचायतीच्या माया भरीतकर व जनाबाई साळवे या दोन सदस्यांना अतिक्रमणप्रकरणी अपात्र ठरविल्याचा निर्णय जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिला आहे. अर्जदार दत्तू रामनाथ भरीतकर राहणार समशेरपूर यांनी तक्रार केली होती. समशेरपूर ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत माया योगेश भरीतकर प्रभाग क्रमांक 4 मधून सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून निवडून आल्याने त्या ग्रामपंचायतीच्या सदस्या आहेत. माया भरीतकर व त्यांच्या कुटुंबियांनी सरकारी मिळकतीमध्ये अनाधिकारासह बेकायदेशीर अतिक्रमण केले आहे, असा दावा करीत दत्तू भरीतकर यांनी विवाद अर्ज दाखल केला होता. माया योगेश भरीतकर व कुटुंबियांनी गट नं. 153/1 मधील सरकारी मालकीच्या ग्रामपंचायत मिळकतीमध्ये बेकायदेशीर 2 घरे बांधली आहेत. या दोन्ही घरांलगत ग्रामपंचायतीची मालमत्ता नं. 451 व 476 आहे. गट नं. 153/9 व 7/12 उतारा, ग्रामपंचायतीचा नमुना नं. 8 चा मालमत्ता क्रमांक 459 व 476 चा उतारा प्रत व ऑनलाईन शिधापत्रिका संदर्भ उतार्‍याची प्रत दत्तू भरीतकर यांनी पुरावा म्हणून सादर केला होता. माया योगेश भरीतकर यांच्या सासूच्या नावे एकत्र कुटुंबाचे अतिक्रमण असल्यामुळे त्यांना ग्रामपंचायतीच्या सदस्य पदावरुन अपात्र ठरावावे, असा दत्तू भरीतकर यांनी जिल्हाधिकारी सालिमठ यांच्याकडे सादर केला होता. दरम्यान, जनाबाई यांच्याविरुध्द अतिरिक्त आयुक्त निवाड्याप्रमाणे अतिक्रमणाबाबत अतिक्रमण धारकासह अतिक्रमण क्षेत्राचा उपभोग घेणारा, अतिक्रमण करणारा या व्यक्ती सदस्यपदी राहण्यास अपात्र आहे, असा आदेश दिला आहे. दरम्यान, दीपक दत्तात्रेय जगताप यांनी ग्रामपंचायत सदस्या जनाबाई माधव साळवे यांच्यासह पती- पत्नीचे एकत्र कुटुंबाचे अतिक्रमण असल्यामुळे त्यांना पदास अपात्र ठरवावे, असा अर्ज सादर केला होता. या दोन्ही अर्जांची सुनावणी झाल्यानंतर माया भरीतकर यांच्या सासूचे अतिक्रमण व जनाबाई साळवे यांचे पती-पत्नीचे अतिक्रमण असल्याची बाब निष्पन्न झाल्यामुळे जिल्हाधिकारी सालिमठ यांनी माया भरीतकर व जनाबाई साळवे या सदस्यांना अपात्र ठरविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सदस्या भरीतकर व जगताप यांच्या वतीने अ‍ॅड. गोरक्ष पालवे यांनी युक्तिवाद केला. त्यांना अ‍ॅड. गुरविंदर पंजाबी, अ‍ॅड. रोहित बुधवंत, अ‍ॅड. सागर गरजे, अ‍ॅड. प्रवीण निंबाळकर, अ‍ॅड. विवेक बडे, अ‍ॅड. धनश्री खेतमाळी, अ‍ॅड. विशाल वांढेकर व अ‍ॅड. राहुल दहिफळे यांनी सहाय्य केले.

COMMENTS