अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याची विशेष सर्वसाधारण सभा संपन्न

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याची विशेष सर्वसाधारण सभा संपन्न

अंबाजोगाई (वार्ताहर):-  अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याची दिनांक,११/१०/२०२१ रोजी विशेष सर्वसाधारण सभा आँनलाईन पध्दतीने खेळीमेळीच्या वातावरणात संपन

वाराणसीच्या धर्तीवर पंढरपूर कॉरिडॉरचा आराखडा    
पनवेलमध्ये अल्पवयीन मुलीवर सलग दोन वर्ष अत्याचार
न्यायालयात जाण्याचे कोणतेही कारण नाही ः जयंत पाटील

अंबाजोगाई (वार्ताहर):- 

अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याची दिनांक,११/१०/२०२१ रोजी विशेष सर्वसाधारण सभा आँनलाईन पध्दतीने खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न,

कारखान्याचे चेअरमन मा श्री रमेशराव आडसकर यांनी दिनांक११/१०/२०२१  रोजी विशेष सर्वसाधारण सभेत सभासदांना आँनलाईन  बोलताना म्हणाले की, अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या संचित तोटा वाढल्याने या कारखान्याला कोणतीही वित्तीय संस्था  आर्थिक मदत करण्यासाठी तयार होत नव्हती म्हणूनच या सर्व बाबींचा विचार करून संचालक मंडळाने हा कारखाना डिस्टलरीसह पंधरा वर्षांसाठी सक्षम एजन्सीला भाडे तत्वावर चालवण्यास देण्याबाबत निर्णय घेतलेला आहे.

जेणेकरून शेतकऱ्यांच्या ऊसाचे वेळेत गाळप होऊन ,ऊस उत्पादक शेतकऱ्यांना किफायतशीर ऊसाला भाव मिळेल, तसेच कामगार व मजुर यांचाही रोजगाराचा प्रश्न उद्भवणार नाही.  व हा कारखाना पंधरा वर्षांसाठी भाडे तत्वावर चालवण्यास दिल्यास त्यापासून कारखान्यास  उपलब्ध झालेल्या रकमेतून केंद्र सरकारची व राज्य सरकारची देणी देण्यासाठी मदत होईल , असेही आडसकर यांनी सांगितले . 

विशेष सर्वसाधारण सभेत चेअरमन रमेश आडसकर यांनी  बहुसंख्येने सभासद आँनलाईन सभेसाठी उपस्थित राहिले त्याबद्दल कारखान्याचे वतीने आभार मानले,या कार्यक्रमासाठी संचालक अजय ढगे , गौतम चौधरी,कार्यकारी संचालक एस बी साखरे, कार्यालयीन अधीक्षक एस बी राऊत, फायनान्स मॅनेजर जि एस मुळे, मुख्य शेतकी अधिकारी रविकिरण देशमुख, पत्रकार वसुदेव शिंदे, तसेच अनिल माचवे सर, सोनवळा से .सो .चेअरमन राधाकिशन सोळंके,मा सभापती विलास सोनवणे इत्यादी उपस्थित होते.

COMMENTS