जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकांचा वाजला बिगुल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकांचा वाजला बिगुल

गट व गण रचनेवर जूनच्या पहिल्या आठवड्यात हरकती-सूचना संकलन

अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्ह्याच्या शहरी भागातील 10 नगरपालिकांची प्रारुप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून उत्सुकता व्यक्त होत अ

उपमुख्यमंत्री फडणवीसांनी राहात्याच्या स्मशानभूमीच्या अत्याधुनिकतेचे केले कौतुक
मांडओहोळ धरण भरले, धबधबे सुरु – पर्यटकांचे आकर्षण ठरणार
पंतप्रधान नरेंद्र मोदीना दाढी कटींग करण्यासाठी चहा विक्रेत्याने पाठवली १०० रूपयांची मनिआँडर l पहा

अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्ह्याच्या शहरी भागातील 10 नगरपालिकांची प्रारुप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून उत्सुकता व्यक्त होत असलेल्या जिल्हा परिषद गट व पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. पहिल्या टप्प्यात नव्या रचना केलेल्या गट व गणांवरील हरकती व सूचनांचे संकलन जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण राजकीय वर्तुळात सर्वांचे लक्ष वेधून घेणार असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजूलागले आहे. जिल्हा परिषदेचे 85 गट व पंचायत समित्यांचे 170 गणांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगामार्फत जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. गट-गणांच्या प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव नगरचे जिल्हाधिकारी नाशिकच्या विभागीय आयुक्तांकडे दि.23 मे पर्यंत सादर करणार असून दि.31 मे पर्यंत विभागीय आयुक्त त्यास मान्यता देणार आहेत. या प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना जिल्हाधिकारी दि.2 जून रोजी प्रसिद्ध करणार असून त्यावर दि.8 जूनपर्यंत हरकती व सूचना सादर करण्याची मुदत आहे. दि.22 जूनपर्यंत विभागीय आयुक्त हरकती व सूचनांवर सुनावणी घेणार असून जिल्हाधिकारी दि.27 जून रोजी अंतिम प्रभाग रचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करणार आहेत. नगर जिल्हा परिषदेचे 73 गट व पंचायत समित्यांचे 146 गण होते. मात्र, शासनाने गट व गणांची संख्या वाढवून अनुक्रमे 85 व 170 केल्याने गट व गणांच्या क्षेत्राची नव्याने रचना करून ती जिल्हा प्रशासनाद्वारे राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवली होती. आयोगाने ती नियमानुसार झाली की नाही, याची पडताळणी केली असून, आता या गट-गण रचनेवर हरकती व सूचना मागवून तसेच त्यावर सुनावणी घेऊन ती अंतिम करण्याची जबाबदारी नाशिक विभागीय आयुक्त व नगरचे जिल्हाधिकारी यांच्यावर दिली गेली आहे. दरम्यान, गट-गणाच्या नव्या रचनेवर हरकती व सूचना मागवल्या गेल्याने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे व यामुळे आता ग्रामीण राजकारणात राजकीय हालचाली गतिमान होणार आहेत.

COMMENTS