Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा परिषद मेगा भरती 1038 जागांसाठी 64080 अर्ज दाखल 

नाशिक :  राज्य सरकारच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षात मेगा भरतीची घोषणा करण्यात आली त्यानुषंगाने जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची भरती

ऑनलाईन समोसे पडले 1 लाख 40 हजाराला
‘टायगर 3’च्या कमाईमध्ये मोठी घसरण
Nashik : नाशिकमध्ये कांद्याला अवघा ७९१ रुपये भाव

नाशिक :  राज्य सरकारच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षात मेगा भरतीची घोषणा करण्यात आली त्यानुषंगाने जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची भरती प्रक्रिया ही आजपासून राबवण्यात येणार आहे. यामध्ये 20 संवर्गातील तब्बल १०३८ पदांची भरती प्रक्रिया पार पडणार असून यासंदर्भातील जाहिरात ही ५ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती, या जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या 1038 जागांसाठी तब्बल 64080 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.

सदर परीक्षेची संपूर्ण भरती प्रक्रिया शासनाने मान्यता दिलेल्या आय.बी.पी.एस. या कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. त्यामुळे सदर परीक्षा अत्यंत पारदर्शक व काटेकोर पद्धतीने होणार आहे. तथापि, काही समाज विघातक प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून प्रलोभन दाखवून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी अशा फसवणूकीपासून उमेदवारांनी दक्षता घ्यावी तसेच अशा प्रकारच्या कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये, अन्यथा अशी फसवणूक झाल्यास शासन अथवा जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही. अशा प्रकारे कोणतीही व्यक्ती परीक्षेसंदर्भात आर्थिक मागणी करीत असल्याबाबत निदर्शनास आल्यास त्यांच्याविरुद्ध जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात यावी, असे सर्व आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

COMMENTS