Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात आढळला झिकाचा रुग्ण

पुणे/प्रतिनिधी - पुणे शहरात झिका आजाराचा रुग्ण आढळल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली. राज्यात गेल्या दोन वर्षांपासून निदान झ

पंजशीरमध्ये घनघोर युद्धाला प्रारंभ… ६०० हुन अधिक तालिबान्यांचा खातमा
शनिवारी बुलढाण्यात सर्व  समाजातिल गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा ! 
राष्ट्रवादीने कायम पाण्याबाबत भेदभाव केला : राम शिंदे

पुणे/प्रतिनिधी – पुणे शहरात झिका आजाराचा रुग्ण आढळल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली. राज्यात गेल्या दोन वर्षांपासून निदान झालेला झिकाचा हा तिसरा रुग्ण आहे. त्यापैकी दोन रुग्ण पुण्यातील असल्याचेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले.
पुण्यात कामासाठी आलेल्या 67 वर्षीय पुरुषाला झिकाचा संसर्ग झाला. हा रुग्ण मूळचा नाशिकचा असून 6 नोव्हेंबरला तो पुण्यात कामासाठी आला होता. त्यापूर्वी 22 ऑक्टोबरला त्याने सूरत येथे प्रवास केला होता. पुण्यात आल्यानंतर रुग्णाला ताप, खोकला, सांधेदुखी आणि थकवा जाणवू लागला. त्यामुळे रुग्णाने वैद्यकीय सल्ल्यासाठी 16 नोव्हेंबरला जहाँगीर रुग्णालय गाठले. रुग्णाला झिका झाल्याचे निदान 18 नोव्हेंबरला शहरातील खासगी प्रयोगशाळेत करण्यात आले. त्यानंतर रुग्णाचा रक्तनमूना तपासण्यासाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत (एनआयव्ही) पाठविण्यात आले. ’एनआयव्ही’ने 30 नोव्हेंबरला दिलेल्या अहवालात रुग्णाला झिकाचा संसर्ग झाल्याचे अधोरेखित केले, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. पुणे जिल्ह्यात गेल्या वर्षी बेलसर येथे झिकाचा रुग्ण आढळला होता. यावर्षी पालघर येथे पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर या वर्षातला दुसरा रुग्ण पुण्यात आढळल्याचे खात्यातर्फे सांगण्यात आले. राज्यात गेल्या दोन वर्षांमध्ये झिकाचे निदान झालेला हा तिसरा रुग्ण आहे.

COMMENTS