Homeताज्या बातम्यादेश

जाकिया जाफरी : एक समर्पित लढा!

  सध्या देशात महाकुंभ मेळा सुरू आहे. पुण्यप्राप्तीसाठी आमचे बांधव करोडोंच्या संख्येने प्रयागराज गाठत आहेत. धर्म आणि जीवन यांच्यात एक ताळमेळ असतो.

विषमतेत वाढ दर्शविणारा अहवाल, चिंताजनक!
जहाजाला छिद्र अन् उंदरांची दाणादाण ! 
इंधन पूर्तता करार अर्थात कच्चे तेल आयात!

  सध्या देशात महाकुंभ मेळा सुरू आहे. पुण्यप्राप्तीसाठी आमचे बांधव करोडोंच्या संख्येने प्रयागराज गाठत आहेत. धर्म आणि जीवन यांच्यात एक ताळमेळ असतो. धर्म कोणताही असो त्यातील अध्यात्मिक स्तर मात्र, माणसाला बंधूभाव किंवा ममत्व शिकवतो. धर्माचे खरे अधिष्ठान त्यातील अध्यात्मात आहे. माणूस ज्या मूल्यांसाठी जगतो, तेच त्याच्या वैयक्तिक जीवनात देखील धर्मतत्व बनून जाते. यात धर्माधर्माचा भेद असत नाही. मानवी जीवनाची मूल्य अहिंसा, दान, शील, सत्य यावर आधारित असते. जीवनात एखाद्या गोष्टीच्या समर्पनात आयुष्य झोकून देणं, ही मानवी जीवनाची सर्वोत्तम शैली आहे. आपल्या आयुष्यात सत्य आणि न्यायासाठी, आयुष्य समर्पित करणारी माणसं नेहमीच जगाचं लक्ष वेधून घेतात. त्यांना धर्म आणि त्याच्या मर्यादा थोपवू शकत नाही! असंच एक व्यक्तिमत्त्व, ज्या व्यक्तिमत्वाने न्यायाच्या संघर्षात स्वतःला समर्पित केलं…! त्या व्यक्तिमत्वाच नाव जाकिया जाफरी! कदाचित, तुम्हाला नाव वाचून आश्चर्य वाटले असेल. परंतु, त्यांनी कधी काळी दाराच्या उंबरठ्यावर येऊन झालेला अत्याचाराविरोधात न्यायाच्या लढ्यासाठी स्वतःला समर्पित केले. आयुष्याची अखेरची २२ वर्षे म्हणजे वयाच्या ६४ वर्षांपासून तर अखेरचा श्वास ८६ व्या वर्षी घेईपर्यंत, त्यांनी दंगलीत मारल्या गेलेल्यांच्या न्यायासाठी अखेरपर्यंत लढा दिला. ज्या भूमीवर त्यांच्या स्वकियांना अत्याचारात बळी जावे लागले; ती भूमी सत्तास्थानावर बळकट असलेल्यांची भूमी राहुनही, त्यांनी, या लढ्याच्या काळात तेथेच ठिय्या देऊन लढा दिला. त्यांची लढण्याची हिंमत ही कोणत्याही धर्मश्रध्द माणसाने दाद द्यावी अशीच आहे. कधीकाळी गुजरात मध्ये झालेल्या धार्मिक दंगलीत जाकिया जाफरी यांच्या पतीचा बळी गेला. त्यांचे पती काॅंग्रेस चे माजी खासदार होते. त्यांच्या गुलबर्ग सोसायटी वर झालेल्या हल्ल्यात त्यांनी गर्दी समोर स्वतःला स्वाधीन केले होते. त्या उन्माद अवस्थेच्या गर्दीने त्यांचा बळी घेतला. असं, म्हटलं जातं की, त्या रात्री अनेकांना फोन करूनही जाफरी यांची निराशा झाली होती. इथपर्यंत, ही कहाणी ठिक होती. परंतु, आमचा प्रश्न हा आहे की, त्यावेळी गुजरात मध्ये काॅंग्रेसचे बडे प्रस्थ असलेला एक काॅंग्रेस नेता, जो काही वर्षांपूर्वी दिवंगत झाला; जो नेता आज गाजत असणाऱ्या दोन काॅर्पोरेटच्या जवळचा नेता होता. त्या नेत्याने गुलबर्ग सोसायटीच्या रक्षणासाठी प्रयत्न केले असते तर, निश्चितपणे ही दुर्घटना कदाचित, घडली नसती.‌ राजकीय जीवनात अनेक धक्कादायक बाबी घडत असतात. त्याकाळात, देशाचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी होते. ज्यांनी राजधर्मा’चा दिलेला पाठ आजही देशात गाजतो. वाजपेयी पंतप्रधान असतानाच्या काळात एक महत्वपूर्ण घटना याठिकाणी नमूद करावीशी वाटते. उत्तर प्रदेश चे सपा-बसपा युतीचे मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव होते. त्यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय मायावती यांनी घेतल्याच्या रात्री, उत्तर प्रदेश चे गेस्ट हाऊस कांड घडविले गेले. यात मायावती यांच्या जीवाला पूर्ण धोका असताना, पंतप्रधान म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांना वाचविण्याचा यशस्वी प्रयत्न केला. तसाच प्रयत्न तत्कालीन गुजरातच्या काॅंग्रेस नेत्याला यशस्वीपणे करता आला असता. परंतु, त्या नेत्याने तसं का केले नाही, हा आमचा खरा प्रश्न आहे. याचा अर्थ असा तर नव्हे, की, राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून आपल्याच पक्षातील सजातीय बांधवाला न वाचविण्याचा प्रयत्न करण्याचे एक षडयंत्र लपले होते का? अर्थात, आज हा प्रश्न विचारण्यात फार काही तत्थ्य असणार नाही. कारण, ज्या अत्याचाराच्या लढ्यासाठी जाकिया जाफरी यांनी त्यांच्या जीवनाचा उत्तर काळ समर्पित केला, त्या अशी आतील माहिती देण्यासाठी आज हयात नाहीत. 

COMMENTS