Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

युवराज गायकवाड जातीय सलोखा जपणारे नेतृत्व : हभप वायसे महाराज

जामखेड/प्रतिनिधी ः सध्या देशाला गरज असलेले जातीय सलोखा निर्माण करण्याचं काम सामाजिक कार्यकर्ते यूवराज साधू गायकवाड करत आहेत. त्यांची धार्मिक वृत्

शिर्डी विमानतळासाठी 876 कोटींच्या निधीस मान्यता
नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर अकोल्यात जल्लोष
Kopargoan : आमदार आशुतोष काळेंचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा l LokNews24

जामखेड/प्रतिनिधी ः सध्या देशाला गरज असलेले जातीय सलोखा निर्माण करण्याचं काम सामाजिक कार्यकर्ते यूवराज साधू गायकवाड करत आहेत. त्यांची धार्मिक वृत्ती आहे मात्र सेवाभावी वृत्तीने काम करण्याची व काम जात पात न पहाता लोक जोडण्याची कला वाखाणण्याजोगी आहे. आज समाजा समाजाला जोडणार्‍या अशाच लोकांची गरज आहे असे प्रतिपादन समाजप्रबोधनकार हभप विकास महाराज वायसे शास्त्री यांनी केले.
जामखेड तालुक्यातील नायगाव येथे कै कलावती साधू गायकवाड, कै अर्जुन साधू गायकवाड तसेच आदर्श गायकवाड यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने संत भगवानबाबा वारकरी शिक्षण संस्थेचे हभप विकास महाराज वायसे शास्त्री तसेच समाजप्रबोधनकार हभप इंदोरिकर महाराज यांच्या किर्तन भजन व हरिपाठ अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख उपस्थितीत आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे, हभप कैलास महाराज भोरे, हभप हनूमान महाराज गवळवाडीकर होते. भाजपा तालूकाध्यक्ष अजय काशीद, ओकार महाराज जगताप, आसाराम महाराज साबळे, हरीभाऊ काळे, देविदास महाराज बरडे, अंगद महाराज,संजय महाराज हजारे, सामाजिक कार्यकर्ते यूवराज अर्जुन गायकवाड, छबुराव अर्जुन गायकवाड, मारूती गायकवाड, अंकुश गायकवाड, रावसाहेब गायकवाड, महेंद्र गायकवाड, अमोल गायकवाड, सचिन गायकवाड, हनुमान गायकवाड, दत्ता गायकवाड, तुषार गायकवाड तालूका उपाध्यक्ष शिवाजी साळवे,सतिश साळवे  ग्रामस्थ नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंचक्रोशीतील शेकडो भाविक भक्तांनी धार्मिक कार्यक्रमांचा आनंद घेतला.

COMMENTS