Homeताज्या बातम्यादेश

युसूफ पठाणच्या अडचणींत वाढ

कोलकाता ः नवनिर्वाचित खासदार आणि प्रसिद्ध क्रिकेटपटू युसूफ पठाण याच्या अडचणीत वाढ होतांना दिसून येत आहे. युसूफ पठाणला सरकारी भूखंडावर अवैध कब्जा

इम्पिरिकल डेटा गोळा केल्यानंतर ओबीसींचे आरक्षण टिकेल का ? : मंत्री विजय वडेट्टीवार यांचा सवाल
सीमा प्रश्‍नाबाबत सर्वोच्च न्यायालयात मांडण्याच्या भूमिकेबाबत सविस्तर चर्चा : ना. शंभूराज देसाई
सिंधुताईंच्या आठवणीने अकोलेकर गहिवरले…

कोलकाता ः नवनिर्वाचित खासदार आणि प्रसिद्ध क्रिकेटपटू युसूफ पठाण याच्या अडचणीत वाढ होतांना दिसून येत आहे. युसूफ पठाणला सरकारी भूखंडावर अवैध कब्जा केल्याप्रकरणी गुजरातच्या वडोदरा महापालिकेने नोटीस बजावली आहे. युसूफ पठाणने पश्‍चिम बंगालच्या बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांना पराभूत केले. युसूफ या यशाचा आनंद साजरा करण्यात व्यस्त असताना वडोदरा महापालिकेने त्याला नोटीस बजावून सरकारी जमिनीवरील अतिक्रमण तात्काळ काढण्याचे निर्देश दिलेत. युसूफ व त्याचा भाऊ इरफान पठाण यांचा वडोदर्‍यात आलिशान बंगला आहे. हा बंगला त्यांनी अवैधपणे बळकावलेल्या भूखंडावर बांधल्याचा आरोप आहे.

COMMENTS