Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

युवकांना नोकरीचे आमिष दाखवुन केली लाखो रुपयांची फसवणूक

बुलढाणा प्रतिनिधी - बुलढाणा जिल्ह्यातील काही युवकांना शासकीय सेवेत नोकरी लावून देण्याचे आमिष देत खामगाव तालुक्यातील शहापूर येथील दिनेश अशोक ति

सायकलिंग खेळाच्या निवड प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन
अग्निशमन दलाची वीज खंडीत
नाशिकमध्ये प्रथमच राष्ट्रीय पातळीवर नॅशनल रॉ बेंच प्रेस अँड डेड लिफ्ट चॅम्पियनशिप कॉम्पिटिशनचे मानवधन संस्थेत आयोजन

बुलढाणा प्रतिनिधी – बुलढाणा जिल्ह्यातील काही युवकांना शासकीय सेवेत नोकरी लावून देण्याचे आमिष देत खामगाव तालुक्यातील शहापूर येथील दिनेश अशोक तिडके या व्यक्तीने अनेक युवकांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील जवळपास २५ ते ३० युवकांकडून संबंधित व्यक्तीने ४० ते ५० हजार रुपये घेतल्याची माहिती या तरुणांनी दिली आहे.  दिनेश तिडके याने काही तरुणांना बनावट नियुक्तीपत्र देखील दिले आहे, नोकरी लागत नसल्याने पैसे परत मागितले असता काही तरुणांना चेक देण्यात आले, मात्र ते चेक देखील बाउन्स झाले आहेत, आता या व्यक्ती विरोधात हे सर्व तरुण फसवणुकीची तक्रार दाखल करणार असल्याची माहिती तरुणांनी दिली आहे.

COMMENTS