Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तरुणांनी नौकरीच्या मागे न लागता व्यवसाय करावा – बी.व्ही.मस्के

केज प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडी केज तालुका अध्यक्ष बी. व्ही.मस्के यांनी केज तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार मुलांना उद्योग -धंद्यासाठी प्रवृत्त

जि.प. शिक्षण विभागातील वेतन व निवृत्तीवेतन 1 सप्टेंबर रोजी खात्यावर जमा 
बाबासाहेब शेलार यांचा नागरी सत्कार
पेपरफ्रायचे सहसंस्थापक अंबरिश मूर्ती यांचे निधन

केज प्रतिनिधी – वंचित बहुजन आघाडी केज तालुका अध्यक्ष बी. व्ही.मस्के यांनी केज तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार मुलांना उद्योग -धंद्यासाठी प्रवृत्त करुन प्रशिक्षणासाठी दीनदयाळ कृषी विज्ञान केंद्र,डीघोळ आंबा,अंबाजोगाई आणी भारतीय स्टेट बैंक,ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्था,बीड येथे अभिप्राय बाबासाहेब मस्के,सिद्धांत अरुण मस्के आणीप्रथमेश प्रवीण घोडके यांना कुक्कुटपालन,शेळीपालन,मत्स्यपालन आणी दुग्ध व्यवसाय प्रशिक्षणासाठी पाठवले होते.त्यापैकी दिनांक 22-07-2023 रोजी दुग्धव्यवसाय आणी कुक्कुटपालन प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र दीनदयाळ कृषी विज्ञान केंद्र,डीघोळआंबा, अंबाजोगाई तर्फे मिळाले. ते प्रमाणपत्र मौजे टाकळी येथे अभिप्राय बाबासाहेब मस्के व सिद्धांत अरुण मस्के यांना वंचित बहुजन आघाडी केजतालुकाध्यक्ष बाबासाहेब विठ्ठल मस्के, अरुण शिवाजी मस्के, धनंजय घुले,मुकेश घुले, भास्कर बारगजे आणी समस्त गावकरी मंडळी यांचा हस्ते प्रदानकरण्यात आले.केज तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी केवळ नोकरी चा मागे न लागता उद्योग धंदे करण्यास प्रशिक्षण घ्यावे त्याकारिता वंचितचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब विठ्ठल मस्के केज तालुक्यामधे अशाच प्रशिक्षणाचे शिबिर आयोजन करणार आहेत त्याचा तालुक्यातील तरुणांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.प्रशिक्षण घेण्यास त्याच्याकडे संपर्क करावा.

COMMENTS