कोटा ः मित्रासोबत पिस्तूल घेऊन व्हिडिओ बनवत असताना पिस्तुलातील गोळी छातीवर लागल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही राजस्थानच्या कोटा येथे घडली.

कोटा ः मित्रासोबत पिस्तूल घेऊन व्हिडिओ बनवत असताना पिस्तुलातील गोळी छातीवर लागल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही राजस्थानच्या कोटा येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंत नागर असे मृत तरुणाचे नाव असून तो झालावाड जिल्ह्यातील रहिवासी आहे. नागर हा मानव्यविद्या विषयात पदवीचे शिक्षण घेत होते आणि कोटा येथे राहत होते. ही घटनेबाबत पोलिसांनी बुधवारी दिली. महावीर नगर एक्सटेंशनमधील महर्षी गौतम भवनजवळील चहाच्या टपरीवर दुपारी तीनच्या सुमारास यशवंत नागर पिस्तुलासह व्हिडिओ बनवत होता. त्याचवेळी पिस्तुलातील सुटून यशवंत नागरच्या छातीवर लागली. यातच त्याचा मृत्यू झाला.
COMMENTS