इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर येथे जयहिंद चित्रमंदीर परिसरात पावसाचे पाणी घर व दुकानात शिरून नागरिकांची दैना झाली आहे. यावर राष्ट्रवादी काँ

इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर येथे जयहिंद चित्रमंदीर परिसरात पावसाचे पाणी घर व दुकानात शिरून नागरिकांची दैना झाली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक व महिला संघटनांनी भर पावसात आंदोलन करून नगरपालिकेच्या विरोधात तीव्र निदर्शने केली. यावेळी इस्लामपूर नगर पालिकेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी संबंधित अधिकार्यांना तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गटारीच्या पाण्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.
युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दिग्विजय पाटील, उपाध्यक्ष अभिजीत कुर्लेकर, सरचिटणीस अभिजीत रासकर, सोशल मिडियाचे शहराध्यक्ष अभिमन्यू क्षीरसागर, अक्षय जाधव, दत्ता फल्ले, सागर पोद्दार, व्यंकटेश्वर राजपूत, रोहित पाटील, अधिक पाटील, उमेश पाटील, प्रवीण पाटील, राज पाटील, प्रसाद वाळवेकर, आनंत वाळवेकर, शिवाजी कदम, महिला शहराध्यक्ष पुष्पलता खरात, सरचिटणीस उषा पंडीत मोरे, उपाध्यक्ष मनिषा पेटकर, अंजना चव्हाण, दीप्ती पानसरे, सुप्रिया कांबळे व परिसरातील नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते.
COMMENTS