Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

युवक मित्र मंडळाचे कार्य प्रेरणादायी – अस्मिता पटेल

नाशिक :  पंचवटी येथील नवीन आडगाव नाका, प्राथमिक विद्या मंदिर येथील शाळेत गरजू विद्यार्थ्यांना १३ वर्षापासून युवक मित्र मंडळाच्या वतीने करण्यात ये

अकोले येथे सर्वधर्मीय वधू-वर मेळावा उत्साहात
सर्वोदयाच्या तीन कुस्ती मल्लांची राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड
 भाजपाच्या जाहीर सभेनंतर सांस्कृतिक क्रीडा मंडळ वर झालेला कचरा खेळाडूंनी उचलला 

नाशिक :  पंचवटी येथील नवीन आडगाव नाका, प्राथमिक विद्या मंदिर येथील शाळेत गरजू विद्यार्थ्यांना १३ वर्षापासून युवक मित्र मंडळाच्या वतीने करण्यात येते. सातत्याने वंचित विद्यार्थ्यांना मोलाची मदत करणाऱ्या युवक मिञ मंडळाचे कार्य प्रेरणादायी असल्याचे स्वामीनारायण इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्यध्यापिका अस्मिता पटेल यांनी सांगितले.  दरवर्षी प्रमाणे यंदाही प्राथमिक विद्या मंदिर शाळेत   

 मुख्यध्यापिका अस्मिता पटेल यांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. युवक मित्र मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ बोडके,  मुख्याध्यापक सुनील सोनार, संतोष जेजुरकर आदी उपस्थित होते.  पटेल म्हणाल्या की, मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ बोडके यांचे सामाजिक कार्य उत्तरोत्तर वाढत आहे.  त्यामुळे त्यांचे करावे तेवढे कौतुक कमी  आहे. सामाजिक कार्य सर्वच करतात, परंतु सातत्याने इतकी वर्ष हे कार्य करत राहणे ही मोठी गोष्ट आहे. विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करुन यश संपादित करावे असे आवाहन पटेल यांनी केले. प्रास्ताविकात मंडळाच्या कार्याविषयी अध्यक्ष आयोजक सोमनाथ बोडके यांनी माहिती दिली. सूत्रसंचालन चंद्रकांत डोंगरे यांनी तर खंडेराव डावरे यांनी आभार मानले. 

कार्यक्रमास शिक्षक गंगाधर बहिरम,मंगला चव्हाण,आशा क्षिरसागर,ज्योती पाटील,अर्चना नाटकर, मीत्तल पटेल, सुभाष जगदाळे,अविनाश वाघ,सरला पाटील,विशाल पवार,भाऊसाहेब बर्वे,ऋतिक डोळसे,अभिषेक बोडके,संजय सोनवणे,आदी सह शिक्षक,पालक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS