जाती निर्मुलनाच्या दिशेने युवावर्ग अग्रेसर!

Homeताज्या बातम्यासंपादकीय

जाती निर्मुलनाच्या दिशेने युवावर्ग अग्रेसर!

महाराष्ट्रातील तरूण दरवर्षी मोठ्या संख्येने आंतरजातीय विवाह करित असून जातीनिर्मूलनाच्या दिशेने हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे, असे मानायला हरकत नाही. गेल्

होळीचे दहन सोमवारी की मंगळवारी ?
मनोज जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणूक लढवावी – प्रकाश आंबेडकर
टेलर दुकानाला भीषण आग ; साडेचार लाखांचे नुकसान

महाराष्ट्रातील तरूण दरवर्षी मोठ्या संख्येने आंतरजातीय विवाह करित असून जातीनिर्मूलनाच्या दिशेने हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे, असे मानायला हरकत नाही. गेल्या चार वर्षात ज्यांची नोंद सरकार दरबारी झाली आहे, त्यानुसार सरासरी चार हजार विवाह हे आंतरजातीय होत आहेत. चार हजार विवाह जेव्हा आपण लक्षात घेतो तेव्हा युवक आणि युवती असे वधू-वर जोडपे लक्षात घेतले तर, आठ हजार युवक-युवती जातीव्यवस्था आणि तिच्या रितीरिवाजांना तिलांजली देत आहेत, हे स्पष्ट होते. यातही ही नोंद आंतरजातीय विवाहाला असणारी शासकीय मदत रेकाॅर्डच्या आकडेवारीनुसार आहे. त्याव्यतिरिक्त असे अनुदान न घेणारे आणि काही कुटुंबे ही समाज परिवर्तनात सक्रिय असल्याने त्यांच्या कुटूंबात असे आंतरजातीय विवाह ऍरेंज पध्दतीने होत असल्याने त्याची नोंद होत नाही. तर, थोडक्यात सांगायचे म्हणजे आंतरजातीय विवाहांचे वाढलेले प्रमाण हे जाती निर्मुलनाच्या दिशेने एक मजबूत पाऊल आहे, असे आपणांस ठामपणे म्हणता येईल. भारतीय समाजव्यवस्था ही जाती ग्रस्त आणि त्यातही क्रमिक असमानतेवर आधारित आहे. यात खालच्या जातीत जन्मलेला कोणी कितीही लायक असला तरी त्याला व्यक्ती म्हणून सन्मान राहीलच याची काहीही शाश्वती नाही. परंतु, वरच्या जातीत जन्म घेतला तर कितीही अवगुण असले तरी ती व्यक्ती सन्मानाला लायकच ठरवली जाते; अशा या जातीग्रस्त व्यवस्थेला पूर्णपणे बदलणे हाच कार्यक्रम महापुरूषांनी सांगितला आहे. जातीव्यवस्थेची जी अंगिभूत वैशिष्ट्ये आहेत ती म्हणजे, १) जातीत जन्म, २) जातीत लग्न, ३) जातीच्या वस्तीत निवास, ४) जातपंचायत, ५) जातीचा जन्मजात व्यवसाय, ६) अंतिम क्षणी जातीतच. या सहा वैशिष्ट्यांनी युक्त अशा जातीव्यवस्थेत शेवटची चार वैशिष्ट्ये ही संवैधानिक लोकशाही व्यवस्थेत निकाली निघाली. संविधानोत्तर काळात आता खेड्यातील जातीनिहाय वस्तीत निवास करणारे शहरांत आता संमिश्र असणाऱ्या काॅलनी, सोसायटी आणि फ्लॅट मध्ये निवास करू लागले. तर, व्यवसायाचे स्वातंत्र्य संविधानाने दिल्यामुळे जातीची ओळख निर्माण करणारे व्यवसाय बऱ्याच जातींनी आणि व्यक्तिंनी त्यागून दिलें. आधुनिक न्यायव्यवस्था आल्याने जातपंचायत करणे हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा ठरतो. खेडी असो वा शहरे आता सामाईक स्मशानभूमी आहेत. या बाबी पाहता जातीव्यवस्थेची अंतिम चार लक्षणं आधीच बाद झालीत. मात्र, पहिली दोन अजूनही बऱ्यापैकी शाबूत आहेत. जन्म घेणे हे कोणत्याही व्यक्तीच्या हाती नसल्याने तो टाळता येत नाही. परंतु, जातीव्यवस्थेचे जे दुसरे लक्षण आहे ते म्हणजे जातीत लग्न; यास आता भारतीय तरूणांनी चांगल्या प्रकारे पराभूत करण्याचे दिसते आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार आंतरजातीय विवाह करण्यात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे. यात गेल्या आर्थिक वर्षातील नोंद पाहता सन २०२१-२२ या वर्षात एकूण चार हजार जोडपी म्हणजे आठ हजार तरूण – तरूणी जातींची बंधने तोडून आंतरजातीय विवाहबद्ध झाली आहेत. यात पहिला क्रमांक कर्नाटक या राज्याचा दिसतो. कर्नाटकात साडेपाच हजार जोडप्यांनी म्हणजे एकूण अकरा हजार युवक-युवती जातींच्या जखडबंद बेड्या तोडून विवाहबद्ध झाले. जातीव्यवस्था निर्मूलनाच्या सहा उपायांपैकी आंतरजातीय विवाह हा एक प्रभावी उपाय असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सांगत! कर्नाटकात महाराष्ट्रापेक्षा जास्त आंतरजातीय विवाह होण्यामागे एक प्रमुख कारण म्हणजे विज्ञान-तंत्रज्ञानातील उच्चशिक्षित तरुण-तरूणींचे वास्तव्या आयटी हब असणाऱ्या बंगलोर शहरात असल्याने त्याचे प्रमाण अधिक दिसून येते. शिक्षणाने जातीव्यवस्थेच्या बेड्या केवळ सैलच होत नाही, तर, त्या तोडून फेकण्याचे धैर्य आणि सद् विवेक विचार तरूण करतात, हे यातून स्पष्ट दिसून येते. आंतरजातीय विवाहबद्ध होणारी जोडपी या देशाला जातीनिर्मूलनाच्या दिशेने घेऊन जाणारे अग्रेसर सैनिक आहेत, असे म्हणणे अवाजवी ठरणार नाही ! 

COMMENTS