Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ग्रामीण भागातील तरुणांनी उद्योग व्यवसायात भरारी घ्यावी ः राजश्रीताई घुले

शेवगाव तालुका ः ग्रामीण भागातील युवक व युवती शिक्षण कला व क्रीडा क्षेत्रात अग्रेसर आहेत. आपल्यातील अंगीकृत गुणांच्या बळावर व्यावसायिक शिक्षणातुन

कोपरगाव विधानसभेची निवडणूक होणार रंगतदार
देसवंडी रस्त्याचा वाद आमदार तनपुरेंच्या मध्यस्थीने निकाली
पाथर्डी तालुक्यातील येळीमध्ये भरदिवसा दरोडा

शेवगाव तालुका ः ग्रामीण भागातील युवक व युवती शिक्षण कला व क्रीडा क्षेत्रात अग्रेसर आहेत. आपल्यातील अंगीकृत गुणांच्या बळावर व्यावसायिक शिक्षणातुन प्रगती साधता येते. हे ग्रामीण भागातील तरुणांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे आता ग्रामीण तरुणांनी स्वतःला कमी न लेखता शिक्षणाबरोबर व्यावसायिक शिक्षण घेऊन उद्योग व्यवसायात भरारी घेतली पाहिजे असे मत माजी जिल्हा परिषद अध्यक्षा नामदार राजश्रीताई घुले यांनी व्यक्त केले.
शेवगाव-नेवासा राजमार्गावरील भातकुडगाव फाटा चौफुल्यावर उद्योग व्यवसायात अधिक प्रगती होत आहे. नवनवीन उद्योग व्यवसाययाने भातकुडगाव फाट्याच्या वैभव भर पडत आहे. त्यातच काळेश्‍वर मेडिकल अ‍ॅड जनरल स्टोअर्स या फार्मचे उद्घाटन ताजनापुर संस्थांचे मठाधिपती महंत बालयोगी महाराज व माजी जिल्हा परिषद आध्यक्षा नामदार राजश्रीताई घुले यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.यावेळी प्रमुख मान्यवरांचा भातकुडगावचे माजी सरपंच शंकरराव नारळकर व संतोष आहेर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष गणेश खंबरे, अशोकराव मेरड, बाळासाहेब काळे, भास्कर चोपडे, रामपाटील आहेर, परसराम फटांगरे,भाऊराव फटांगरे, संजय आहेर, जालिंदर नजन,अशोक आहेर, भाऊसाहेब आहेर,शेषराव काळे,आप्पासाहेब कमानदार,रामभाऊ तोगे,विजय काळे, गणेश शिंदे,जालिंदर आहेर, महादेव आहेर, उस्मानभाई सय्यद, हनुमान आठरे, देविदास खेडेकर, देवदास वाघमारे, रामेश्‍वर नजन, भारत चोपडे, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर  उपस्थितांचे आकाश आहेर यांनी आभार मानले.

शेतकरी कुटुंबातील मुलांनी व्यावसायिक शिक्षणाला प्राधान्य दिले पाहिजे.कोणत्याही क्षेत्रात नावलौकिक मिळवताना जनसेवे -बरोबर आई-वडिलांची सेवा करून उद्योग व्यवसायात प्रगती साधली पाहिजे.प्रामाणिक व कष्ट करणार्‍यांना ईश्‍वर नेहमीचा प्रगतीचा मार्ग दाखवतो.
महंत बालयोगी महाराज, ताजनापूर संस्थान

COMMENTS