केबल गुंडाळण्याच्या मशीनमध्ये अडकून तरूण कामगाराचा मृत्यू.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केबल गुंडाळण्याच्या मशीनमध्ये अडकून तरूण कामगाराचा मृत्यू.

कंपनीच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा नागरिकांचा आरोप

पुणे प्रतिनिधी- खासगी कंपनीत केबल गुंडाळण्याच्या मशीनमध्ये अडकून एका तरूण कामगाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्याच्या खेड ताल

मेहबूब पानसरे हत्याकांडातील आरोपी गजाआड
केंद्राकडून म्हाळुंगे-माण नगररचना योजनेसाठी निधी
साऊथ स्टार कीर्ती सुरेश लवकरच अडकणार लग्नबंधनात ?

पुणे प्रतिनिधी– खासगी कंपनीत केबल गुंडाळण्याच्या मशीनमध्ये अडकून एका तरूण कामगाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्याच्या खेड तालुक्यातील कंपनीत ही घटना घडली आहे. यामध्ये स्वस्तिक दयाराम शेलार(Swastik Dayaram Shelar) असे मृत्यू झालेल्या 25 वर्षीय तरुणाचे नाव आहे. कंपनीत काम करीत असताना मशीनमध्ये हात जाऊन मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तर कंपनीच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा नागरिकांनी आरोप केला आहे. कंपनी प्रशासनाच्या विरोधात खेड पोलीस स्टेशन(Police Station) मध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. 

COMMENTS