Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तांबवा येथे जुन्या वादातून तरुणावर कत्तीने हल्ला,पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंद

केज : केज तालुक्यातील तांबवा येथे जुन्या वादाची कुरापत काढून एका तरुणावर कत्तीने आणि लोखंडी रॉडने जीवघेणा हल्लाकेल्याची धक्कादायक घटना घडली असून

घळाटवाडी मारहाण प्रकरण : आरोपींना तात्काळ अटक करा-अ‍ॅड.सुभाष राऊत मेंढपाळांसह ओबीसी समाजावरील हल्ले कदापी सहन करणार नाहीत; समता परिषदेचा इशा
विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा जल्लोष; आदित्य शिक्षण संस्थेच्या स्नेहसंमेलनाची उत्साहात सुरुवातपारंपरिक नृत्य, देशभक्तीपर गीत व समूह सादरीकरणांनी पहिल्या दिवसाला रंगत
येडेश्वरीचे सर्वाधिक गाळप; कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वीरीत्या संपन्न 9.22 लाख मेट्रिक टन ऊस गाळप; खा.बजरंग सोनवणे यांनी शेतकरी-कामगारांचे केले कौतूक

केज : केज तालुक्यातील तांबवा येथे जुन्या वादाची कुरापत काढून एका तरुणावर कत्तीने आणि लोखंडी रॉडने जीवघेणा हल्लाकेल्याची धक्कादायक घटना घडली असून याप्रकरणी केज पोलीसात पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नरसिंग उर्फ संग्राम अभिमान चाटे,रा.तांबवा यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.गुरूवार दि. 12 मार्च रोजी दुपारी दीडच्या सुमारास संग्राम चाटे आणि त्यांचा मित्र अदित्य बडे हे तांबवा येथील जिल्हा परिषद शाळेजवळून मुख्य रस्त्याने जात असताना आरोपींनी त्यांची दुचाकी आडवून,दया विलासचाटे याने जुन्या भांडणाची कुरापत काढून जिवे मारण्याच्या उद्देशाने संग्रामच्या डोक्यावर धारदार कत्तीने वार केला  शरद परमेश्वर चाटे याने संग्रामच्या डोळ्यात मिरची पूड टाकली,तर अमोल अनिल ठोंबरे, सागर रामधन चाटेआणि गोट्या भालेकर यांनी लोखंडी रॉडने संग्रामच्या पाठीवर,खांद्यावर आणि मानेवर बेदम मारहाण केली.या हल्ल्यानंतर संग्राम बेशुद्ध पडला होता.त्याला तातडीने केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारा साठी दाखल करण्यात आले.याप्रकरणी नरसिंग उर्फ संग्राम अभिमान चाटे यांचे फिर्यादीवरून  दया विलास चाटे,शरद परमेश्वर चाटे,अमोल अनिल ठोंबरे,सागर रामधन चाटे व गोट्या भालेकर या पाच जणां विरुद्ध केज पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे हे पुढील तपास करीत आहेत.

COMMENTS