Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गांजाचे व्यसन लावल्याने तरुणीची आत्महत्या

पुणे ः महाविद्यालयात शिकत असलेल्या वर्गातील मैत्रिणीने सिगारेट आणि गांजा ओढण्याची सवय लावल्याने एक महाविद्यालयीन तरुणी अमली पदार्थाच्या सेवनाला ब

ऑनलाइन गेममध्ये हरल्यानंतर तरूणाची आत्महत्या
डोकेदुखीला कंटाळून 21 वर्षीय मुलीची आत्महत्या
सहायक पोलिस आयुक्ताची पत्नी आणि पुतण्यासह आत्महत्या

पुणे ः महाविद्यालयात शिकत असलेल्या वर्गातील मैत्रिणीने सिगारेट आणि गांजा ओढण्याची सवय लावल्याने एक महाविद्यालयीन तरुणी अमली पदार्थाच्या सेवनाला बळी पडली. तर एका मित्राने प्रेमसंबंधातून तिच्यावर दुसरीकडे प्रेमसंबंध असल्याचा संशय घेऊन मारहाण केल्याने संबंधित महाविद्यालयीन तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
तरुणीने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी मिळून आल्याने तिचा मित्र आणि मैत्रिणीवर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. हरलीन कौर (वय 21, रा. विमाननगर, पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. साईराज आणि उत्कर्षा ससाणे (रा.पुणे)अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत हरलीनच्या आईने विमानतळ पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात फिर्याद दिली आहे. अमृतसरहून कौर कुटुंबीय पुण्यात परतले. त्यानंतर आईने हरलीनची वही, पुस्तक उघडून पाहिले. तेव्हा हरलीनने वहीत आत्महत्येपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी सापडली.’ मैत्रिणीने सिगारेट आणि गांजा ओढण्याची सवय लावली होती. तर मित्र साईराज दुसर्‍या मुलाशी प्रेमसंबंध असल्याच्या संशायवरूरुन मारहाण करायचा. त्याने हरलीनचा मोबाइलही काढून घेतला होता.

COMMENTS