तरुण पिढीमध्ये विवाहपूर्व समुपदेशन आवश्यक : न्यायाधीश नेत्रा कंक यांचे प्रतिपादन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तरुण पिढीमध्ये विवाहपूर्व समुपदेशन आवश्यक : न्यायाधीश नेत्रा कंक यांचे प्रतिपादन

अहमदनगर/प्रतिनिधी : सध्याच्या तरुण पिढीमध्ये मोठ्या प्रमाणात फाजील आत्मविश्‍वास असून संयमाचा अभाव जाणवत आहे. त्यामुळे घटस्फोटाचे दावे वाढत आहेत. या प

Sangmaner : संगमनेर मध्ये भाजपाचे घंटानाद आंदोलन l LokNews24
माजी मंत्री स्व. कोल्हे यांच्या जयंतीनिमित्त विविध सेवांचे लोकार्पण
‘इन्फ्लूएंझा’ रोखण्यासाठी आरोग्य विभागाने सतर्क राहावे ः आ. आशुतोष काळे

अहमदनगर/प्रतिनिधी : सध्याच्या तरुण पिढीमध्ये मोठ्या प्रमाणात फाजील आत्मविश्‍वास असून संयमाचा अभाव जाणवत आहे. त्यामुळे घटस्फोटाचे दावे वाढत आहेत. या पार्श्‍वभूमीवर, विवाहानंतर नवरा-बायको व सासू-सुना यांच्यात वाद होवूनच नये यासाठी विवाहपूर्व समुपदेशन होणे फार आवश्यक झाले आहे, असे प्रतिपादन कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश नेत्रा कंक यांनी येथे केले.
नगरच्या कौटुंबिक न्यायालयात शहर वकील संघटना व सेंट्रल बार असोसिएशनच्यावतीने मध्यस्थी प्रक्रीयेबाबत जन जागरूकता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायाधीश नेत्रा कंक होत्या. यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड.अनिल सरोदे, सेंट्रल बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड.सुभाष काकडे, केंद्र सरकारचे वकील सुभाष भोर, उपाध्यक्ष संदीप वांढेकर, वक्ते अ‍ॅड.नीलमणी गांधी, भरोसा सेलच्या पोलीस निरीक्षक पल्लवी देशमुख, समुपदेशक सुषमा बिडवे उपस्थित होते.
मध्यस्थीच्या माध्यमातून न्यायालयातील दावा सोडवणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. न्याय प्रक्रियेत मध्यस्थी हा महत्वाचा दुवा आहे. कौटुंबिक न्यायालयात जास्तीतजास्त प्रयत्नाने समुपदेशन व मध्यस्थींद्वारे सामोचाराने सोडवून तुटणारे संसार पुन्हा जोडले जात आहेत. त्यामुळे जास्तीतजास्त पक्षकारांनी आपसातील दावे सोडवण्यासाठी न्यायालयामधील मध्यस्थींचा लाभ घ्यावा, असे आवाहन न्यायाधीश कंक यांनी केले.
प्रास्ताविकात अ‍ॅड. सरोदे म्हणाले, भारतीय संस्कृतीमध्ये कुटुंब व वैवाहिक संस्था यांना महत्व आहे. केंद्र सरकारने 1984 साली कौटुंबिक वाद मिटण्यासाठी कौटुंबिक न्यायालयाची स्थापना केली आहे. कुटुंब संस्था व वैवाहिक संस्था टिकण्यासाठी नगरमध्येही कौटुंबिक न्यायालयाच्या माध्यमातून मध्यस्थींच्या माध्यमातून खटले निकाली काढले जात आहेत. अ‍ॅड. काकडे यांनी मध्यस्थीमध्ये पक्षकार व वकिलांची भूमिका मांडताना म्हणाले, न्यायालयामध्ये खटले वाढत आहेत. त्यामुळे पक्षकारांमध्ये मध्यस्थींबबत जागृती होणे अत्यावश्यक आहे. पक्षकारांनी आपला वेळ, पैसा व कष्ट वाचण्यासाठी वादाच्या निराकरणासाठी मध्यस्थी हा पर्यायी मार्ग स्वीकारावा. प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी वकील व समुपदेशक यांची महत्वाची भूमिका आहे, असे ते म्हणाले.
यावेळी अ‍ॅड. भोर यांनी मध्यस्थीचे तत्व व जागरूकता, अ‍ॅड. गांधी यांनी मध्यस्थीचे नियम व फायदे, सुषमा बिडवे व अ‍ॅड.निर्मला चौधरी यांनी समुपदेशकाचे काम आदी विषयांवर माहिती दिली. सूत्रसंचालन अ‍ॅड. अभय राजे यांनी केले. अ‍ॅड. सागर पादीर यांनी आभार मानले. यावेळी विशेष सरकारी वकील अ‍ॅड.सुरेश लगड, माजी अध्यक्ष अ‍ॅड. शिवाजी कराळे, कौटुंबिक न्यायालायाचे माजी अधीक्षक नवाझ शेख उपस्थित होते.

आरती केली व नांदायला गेले…
यावेळी पोलीस निरीक्षक पल्लवी देशमुख यांनी भरोसा सेलही मध्यस्थीच्या माध्यमातून नवरा-बायको मधील तंटे सोडवत असल्याचे सांगून एका विभक्त होणार्‍या नवरा-बायकोला शेवटचा उपाय म्हणून दिलासा सेलच्या कार्यालयातील गणपतीची आरती दोघांना एकत्र करायला लावली. त्याचा परिणाम इतका झाला की दोघांनी चर्चा करून वाद मिटवले व आता आनंदाने नांदत आहेत. असा अनुभव सांगितला.

COMMENTS