Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात इंजिनिअर तरूणीची गोळ्या झाडून हत्या

पुणे ः पुण्यातील आयटी हट म्हणून हिंजेवडी ओळखले जाते. याच हिंजवडीत एका आयटी इंजिनिअर तरुणीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मृतदेह एका लॉजमध्

बीडमध्ये पुन्हा पत्नीने पतीचा गळा आवळून केला खून
आईने आपल्या दोन मुलांची केली हत्या
दारू पिताना झालेल्या वादातून एकाची हत्या

पुणे ः पुण्यातील आयटी हट म्हणून हिंजेवडी ओळखले जाते. याच हिंजवडीत एका आयटी इंजिनिअर तरुणीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मृतदेह एका लॉजमध्ये सापडल्याने खळबळ उडालेली आहे. हत्या करणार्‍या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रेम संबंधांतून हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, हिंजवडी पोलिस स्टेशन हद्दीतील महारुंजी भागातील सुपर ओयो टाऊन हाऊस इम्पेरियल या लॉजमध्ये तरुणीची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. वंदना द्विवेदी (वय, 26) असे या तरुणीचे नाव असून ती मागील दोन दिवसापासून तिचा लखनौवरुन आलेला मित्र ऋषभ निगम यांच्यासोबत वास्तव्यास होती. रविवारी सकाळी ऋषभ निगम याने वंदनाची बंदुकीने गोळी झाडून हत्या केली. हा हत्येनंतर तो लखनऊला जाण्यासाठी पळून गेला, मात्र मुंबई पोलिसांनी त्याला नाकाबंदी करत ताब्यात घेतले. तसेच हत्येत वापरण्यात आलेली पिस्टलही त्याच्याकडून जप्त करण्यात आले आहे. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून प्रेमप्रकरणातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. काही दिवसांपूर्वी हिंजवडीत पत्नीच्या प्रियकराची माहिती मिळाल्यावर पतीने प्रियकराची चाकुच्या साह्याने वार करत हत्या केल्याचा प्रकार पुण्यातील हिंजवडी येथे उघडकीस आला होता. या प्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.

COMMENTS