Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अत्याचारप्रकरणी युवकास अटक

वाई / प्रतिनिधी : वाई शहरातील एका अल्पवयीन मुलीवर युवकाने अत्याचार केला. यातून पीडित मुलगी गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी

कराड-पाटण मार्गावर स्कॉपिओ-टेम्पो धडक; स्कॉपिओ चालक गंभीर
जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा 2 लाख 87 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त
फलटणला होणारे राष्ट्रीय सामने यशस्वी पार पडतील : श्रीमंत रामराजे

वाई / प्रतिनिधी : वाई शहरातील एका अल्पवयीन मुलीवर युवकाने अत्याचार केला. यातून पीडित मुलगी गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत संशयित युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. अभिषेक संतोष पाकिरे (रा. गडचीमाची, ता. वाई) असे पोलिसांनी अटक केलेल्या युवकाचे नाव आहे.
अभिषेक पाकिरे याने दि. 15 जानेवारी रोजी पीडित मुलीला दुचाकीवरून एका निर्जन ठिकाणी नेले. त्याठिकाणी जबरदस्तीने अत्याचार केले. हा प्रकार कोणाला सांगितलास तर तुला आणि तुझ्या घरच्यांना ठार मारेन, अशी त्याने धमकी दिली. त्यामुळे त्या मुलीने हा प्रकार कोणाला सांगितला नाही. काही दिवसांपूर्वी मुलीच्या पोटात दुखू लागल्यानंतर घरच्यांनी तिला डॉक्टरांकडे नेले. त्यावेळी ती मुलगी गर्भवती असल्याचे समोर आले. प्रकारानंतर मुलीच्या नातेवाईकांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी गुन्हा दाखल करत अभिषेक याला अटक केली.

COMMENTS