Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कितीही यश मिळविले तरी गुरुजनांना विसरू नये : माजी आ.पिचड 

अकोले : जीवनाच्या विविध क्षेत्रात मॉडर्न हायस्कूलचे विद्यार्थी आज कार्यरत आहेत. गेल्या सात दशकांपेक्षा अधिक काळ विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्याचे काम हे विद्यालय करत आले आहे. विद्यार्थी घडविण्यात विद्यालयातील आजी माजी शिक्षकांचा मोठा वाटा आहे. विद्यार्थ्यांनी जीवनात कितीही यश मिळविले तरी आपली शाळा आणि गुरुजनांना विसरू नये असे आवाहन महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाचे संचालक व माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केले.  मॉडर्न हायस्कूल जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, सोमचंद शहा कॉमर्स व भास्करराव कदम गुरुजी सायन्स अकोलेचे ७५ वे स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार वैभवराव पिचड बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. रमेश झरकर होते.  यावेळी हिंद सेवा मंडळाचे कार्यकारिणी सदस्य दिलीप शहा, सहा.सचिव योगेश देशमुख, मॉडर्न ज्युनियर कॉलेजचे चेअरमन तथा नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, मॉडर्न हायस्कूलचे चेअरमन मोरेश्वर धर्माधिकारी, ज्ञानवर्धीनी प्राथमिक शाळेच्या चेअरमन स्मिता मुंदडा, बालक मंदिर चे चेअरमन रामेश्वर रासने, ज्ञानदेव मुरकुटे, वर्षा मुरकुटे, सतिश फरगाडे, अमोल वैद्य, प्रतिमा कुलकर्णी, सेवानिवृत्त प्राचार्य संतोष कचरे, एस पी देशमुख, प्रा.किसनराव शेवाळे, जयप्रकाश महाले,सुधीर जोशी, भागवत त्रिभुवन, अनिल भळगट, भाऊसाहेब वाकचौरे, कमल  कदम, प्रभावती महाले, सुधा  देशपांडे, पुष्पा वाणी, सुरेखा धर्माधिकारी, विद्यार्थी प्रतिनिधी स्वामी तिटमे, प्रथमेश मंडलिक, हर्ष नाईकवाडी, विद्यार्थिनी प्रतिनिधी कार्तिकी देशमुख, साक्षी बहिरट, अन्वी मंडलिक आदी व्यासपीठावर उपस्थित होत्या.   अध्यक्षीय भाषणात हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. रमेश झरकर म्हणाले संस्थेच्या सर्व विद्यालयांवर मंडळाचे मानद सचिव संजय जोशी व सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ यांचे बारकाईने लक्ष असते. अकोले, मिरजगाव, श्रीरामपूर व अहिल्यानगर येथील सर्व युनिट उत्कृष्ट पणे गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहेत.  माजी विद्यार्थी व जीएसटी विभाग नाशिक येथील राज्यकर उपायुक्त ज्ञानदेव मुरकुटे यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थ्यानी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेण्याबरोबरच खूप अभ्यास करावा व शाळेचे नाव मोठे करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मॉडर्न हायस्कूलचे चेअरमन मोरेश्वर धर्माधिकारी यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व स्वागत उपमुख्याध्यापक सुधीर जोशी यांनी केले. अहवालवाचन प्राचार्या चित्रा कांबळे, पाहुण्यांचा परिचय  दिलीप झोळेकर यांनी केले. सूत्रसंचालन गणेश जोशी व प्रा. बाळासाहेब भोत यांनी केले. 

विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
रंधा येथे राबविले स्वच्छता अभियान
एकदरेत ‘ओम श्री मोखाजी बाबा’ यात्रा उत्साहात

अकोले : जीवनाच्या विविध क्षेत्रात मॉडर्न हायस्कूलचे विद्यार्थी आज कार्यरत आहेत. गेल्या सात दशकांपेक्षा अधिक काळ विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्याचे काम हे विद्यालय करत आले आहे. विद्यार्थी घडविण्यात विद्यालयातील आजी माजी शिक्षकांचा मोठा वाटा आहे. विद्यार्थ्यांनी जीवनात कितीही यश मिळविले तरी आपली शाळा आणि गुरुजनांना विसरू नये असे आवाहन महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाचे संचालक व माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केले.

 मॉडर्न हायस्कूल जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, सोमचंद शहा कॉमर्स व भास्करराव कदम गुरुजी सायन्स अकोलेचे ७५ वे स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार वैभवराव पिचड बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. रमेश झरकर होते.

 यावेळी हिंद सेवा मंडळाचे कार्यकारिणी सदस्य दिलीप शहा, सहा.सचिव योगेश देशमुख, मॉडर्न ज्युनियर कॉलेजचे चेअरमन तथा नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, मॉडर्न हायस्कूलचे चेअरमन मोरेश्वर धर्माधिकारी, ज्ञानवर्धीनी प्राथमिक शाळेच्या चेअरमन स्मिता मुंदडा, बालक मंदिर चे चेअरमन रामेश्वर रासने, ज्ञानदेव मुरकुटे, वर्षा मुरकुटे, सतिश फरगाडे, अमोल वैद्य, प्रतिमा कुलकर्णी, सेवानिवृत्त प्राचार्य संतोष कचरे, एस पी देशमुख, प्रा.किसनराव शेवाळे, जयप्रकाश महाले,सुधीर जोशी, भागवत त्रिभुवन, अनिल भळगट, भाऊसाहेब वाकचौरे, कमल  कदम, प्रभावती महाले, सुधा  देशपांडे, पुष्पा वाणी, सुरेखा धर्माधिकारी, विद्यार्थी प्रतिनिधी स्वामी तिटमे, प्रथमेश मंडलिक, हर्ष नाईकवाडी, विद्यार्थिनी प्रतिनिधी कार्तिकी देशमुख, साक्षी बहिरट, अन्वी मंडलिक आदी व्यासपीठावर उपस्थित होत्या.

  अध्यक्षीय भाषणात हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. रमेश झरकर म्हणाले संस्थेच्या सर्व विद्यालयांवर मंडळाचे मानद सचिव संजय जोशी व सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ यांचे बारकाईने लक्ष असते. अकोले, मिरजगाव, श्रीरामपूर व अहिल्यानगर येथील सर्व युनिट उत्कृष्ट पणे गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहेत. 

माजी विद्यार्थी व जीएसटी विभाग नाशिक येथील राज्यकर उपायुक्त ज्ञानदेव मुरकुटे यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थ्यानी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेण्याबरोबरच खूप अभ्यास करावा व शाळेचे नाव मोठे करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मॉडर्न हायस्कूलचे चेअरमन मोरेश्वर धर्माधिकारी यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व स्वागत उपमुख्याध्यापक सुधीर जोशी यांनी केले. अहवालवाचन प्राचार्या चित्रा कांबळे, पाहुण्यांचा परिचय  दिलीप झोळेकर यांनी केले. सूत्रसंचालन गणेश जोशी व प्रा. बाळासाहेब भोत यांनी केले. 

COMMENTS