Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तुम्ही टीका करत राहा , आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे

प्रवीण दरेकरांचा ठाकरेंना टोला

कल्याण प्रतिनिधी - आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेब विचार करत असतील गद्दार माझं तैलचित्र लावणार का ? अशी टीका शिंदे गटावर केली होती. विधान परिषदेचे

निवडणुकीचे गाजर आणि घोषणांचा पाऊस
केंद्रीय पथकाकडून सातारा जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा ; प्रशासनास महत्वपूर्ण सूचनांचा डोस
शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या तरुणाचा शॉक लागून मृत्यू.

कल्याण प्रतिनिधी – आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेब विचार करत असतील गद्दार माझं तैलचित्र लावणार का ? अशी टीका शिंदे गटावर केली होती. विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. मला वाटतं अजूनही सुधारायचं लक्षण दिसत नाही गद्दार गद्दार खोके बोके याच्या पलीकडे शिंदे साहेब कोसो दूर गेलेत. तुम्ही टीका करत रहा. तुम्ही टोमणे मारत रहा. आम्हाला महाराष्ट्राच्या विकासाचा पडलेलं आहे.  तुम्ही अडीच वर्षात महाराष्ट्राच वाटोळं केलं. 25 वर्षात मुंबईची वाट लावली. आता आम्हाला विकास करायचा आहे. तुमच्याकडे आम्हाला लक्ष द्यायचं नाही. अडीच वर्षे दस्तूर खुद्द उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते ना ? मग का नाही त्यांनी आपल्या वडिलांचं तैल चित्र लावलं असा सवाल दरेकर यांनी केला. पुढे बोलताना  तुम्ही हिंदुत्वाचा विचार काँग्रेसच्या पायाशी गहाण ठेवला . त्याच्यामुळे तुम्हाला हिंदुत्व नको बाळासाहेबांचा विचार नको आणि तैलचित्र आम्ही लावतोय तर नाकाने कांदे सोडण्याचा प्रकार आहे उलट तुम्ही अभिनंदन केलं पाहिजे. आपल्या आजोबांचं जर तेल चित्र लागतेय तर आनंद व्यक्त करायला पाहिजे. याच गद्दारांनी  तुम्हाला सत्तेत बसवलं त्याच गद्दारानी शिवसेना वाढवली आणि आता ते गद्दार झाले.  चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्षे आयुष्यातले घालवले ते एका दिवसात गद्दार झाले. अजून तरी  आत्मपरीक्षण करा. जरा सुधरा. आता तरी टीका टिपणीतून बाहेर या अशी टीका दरेकर यांनी केली. उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर युतीच्या घोषणेबाबत प्रवीण दरेकर यांना विचारल असता ही युती होते याच्यात आगळे वेगळे काही नाही. राज्यात एकापेक्षा अनेक पक्ष एकत्र येत असतात. युती होत असते आणि उद्या झाली तर ती युती असेल. याच्या व्यतिरिक्त विशेष असं काही त्यासाठी म्हणण्याचा कारण नाही.

COMMENTS