Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

योगासनाचा समावेश क्रीडा प्रकारात करावा

आमदार सत्यजीत तांबेंची विधान परिषदेत मागणी

मुंबई/प्रतिनिधी ः राज्य सरकारतर्फे देण्यात येणार्‍या प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार व क्रीडा प्रकारांमध्ये योगासनाचा समावेश करण्यात याव

कुपोषित बालकांसाठी टास्क फोर्स तयार करा
आरटीई शुल्क प्रतिपूर्तीची थकीत रक्कम कधी देणार?  
बोटा येथे ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा सेंटर मंजूर

मुंबई/प्रतिनिधी ः राज्य सरकारतर्फे देण्यात येणार्‍या प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार व क्रीडा प्रकारांमध्ये योगासनाचा समावेश करण्यात यावा. केंद्राप्रमाणे राज्य शासनाने ही क्रीडा प्रकारात योगासनाचा समावेश करावा, अशी आग्रही मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली. या मागणीवर उत्तर देताना याबाबत सरकार सकारात्मक असून लवकरच याबाबतचा निर्णय घेणार असल्याची माहिती क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी दिली. आमदार सत्यजीत तांबे यांनी विधानपरिषदेत चर्चेत सहभागी होताना योगासनाचा समावेश शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांमध्ये करण्याची मागणी केली. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे म्हणाले की, शिक्षण क्षेत्र, नोकरी, पुरस्कार, किंवा राज्यशासनाच्या बाबतीत हे सगळे लाभ योगासन खेळाडूंना मिळाले पाहिजे. योगासन या क्रीडा प्रकाराचा 2020 मध्ये केंद्र सरकारने राष्ट्रीय खेळांमध्ये समावेश केला गेला आहे. सन 2022 मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला 140 पदक मिळाले. त्यामध्ये 16 पदके हे योगासनांमध्ये मिळाले, त्यामुळे सरकारने या पुरस्कारांमध्ये योगासनाचा समावेश करावा, अशी मागणी त्यांनी केली.
सत्यजीत तांबे यांच्या मागणीला उत्तर देताना क्रीडा मंत्री संजय बनसोडे म्हणाले की, याबाबत तपासू आणि निर्णय घेऊ. मात्र, योगासनाचा अंतर्भाव करायलाच पाहिजे असा वरुन निर्णय आहे. त्यामुळे तपासण्याची गरज नाही, योगासनाचा क्रीडा प्रकारात समावेश करण्याचा निर्णय घ्या, असे निर्देश उप सभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी पिठासनावरुन दिले. केंद्राने योगासनांचा क्रीडा प्रकारात समावेश केला आहे तर राज्य सरकार देखील योगासनाचा क्रीडा प्रकारात समावेश करेल व लवकरच याचा निर्णय घेतला जाईल, असे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी स्पष्ट केले.

COMMENTS