मुंबई ः नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात आता पिवळया कलिंगडाची आवक वाढली आहे. पिवळे कलिंगड आरोग्याला पोषक असल्याचे व्यापारी सांगतात. हे कलिंगड चवीला ग

मुंबई ः नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात आता पिवळया कलिंगडाची आवक वाढली आहे. पिवळे कलिंगड आरोग्याला पोषक असल्याचे व्यापारी सांगतात. हे कलिंगड चवीला गोड आहेत. पिवळ्या कलिंगडाची आवक केवळ तीन महिनेच राहणार आहे. याला ग्राहकांची मोठी पसंती मिळू लागली आहे. दरम्यान लाल कलिंगडपेक्षा पिवळ्या कलिंगडचे दर एपीएमसी बाजारात दुप्पट असल्याचे चित्र आहे. एपीएमसी फळ बाजारात लाल कलिंगडाची मोठी आवक झाली होती. महाराष्ट्र राज्यसह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि मध्यप्रदेश या राज्यातून देखील कलिंगडाची मोठी आवक झाली होती. आता पिवळे कलिंगड देखील बाजारात मोठ्या प्रमाणात येत आहे.
COMMENTS