Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

येडेमच्छिंद्र-कराड काँग्रेसची संविधान बचाव पदयात्रेचे आयोजन

इस्लामपूर / प्रतिनिधी : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सुचनेनुसार सांगली जिल्हा काँग्रेस ओबीसी विभाग, अल्प संख्यांक काँग्रेस आणि काँग्रेस अनुसूचित जा

राजभवनाच्या नावाने बँकेत खाते नसल्याने पैसे पक्षाला दिल्याचा न्यायालयात युक्तीवाद
हनुमान चालीसासह भोंग्यांची भाषेमुळे समाजात तेढ निर्माण : ना. जयंत पाटील
सोलापुरातील एनटीपीसी केंद्राकडून 525 मेगावॅटची वीजनिर्मिती सुरू

इस्लामपूर / प्रतिनिधी : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सुचनेनुसार सांगली जिल्हा काँग्रेस ओबीसी विभाग, अल्प संख्यांक काँग्रेस आणि काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या संयुक्त विद्यमाने 3 डिसेंबर रोजी संविधान बचाव यात्रेचे आयोजन केले आहे. ही पदयात्रा येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून ते कराड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत पदयात्रा निघणार असल्याचे महाराष्ट्र काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.
या यात्रेमध्ये प्रामुख्याने संविधान बचाव, भाजप हटावोचा नारा पदयात्रेत देण्यात येणार आहे. कराड येथील सांगता सभेला माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, डॉ. वजाहत मिर्झा हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रदेश सरचिटणीस नंदकुमार कुंभार, शाकिर तांबोळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
भानुदास माळी म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रात संविधान बचाव पदयात्रा काढण्यात येणार आहे. त्याची सुरूवात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या येडेमचिंद्र मधून होणार आहे. या गावातून क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या वारस बाबुराव व सुबराव ज्ञानू पाटील यांच्याकडून तिरंगा ध्वज घेऊन यात्रेस प्रारंभ केला जाणार आहे. या यात्रेला सातारा व सांगली जिल्ह्यातील हजारो लोक सहभागी होणार आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य सामाजिक व राजकीय संघटना यात्रेत सहभागी होणार आहेत.
देशाचे संविधान धोक्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना तिलांजली दिली जात आहे. देशाची प्रॉपर्टी खाजगी मालकांना विकले जात आहे. भाजपने संविधानाचा गाभा काढून घेतला आहे. देशाची श्रीलंका होते की काय अशी अवस्था आहे. संविधान वाचला पाहिजे. गेल्या 70 वर्षापासून संविधानाप्रमाणे काँग्रेसने कारभार केला आहे. शैक्षणिकसह इतर मूलभूत गरजांच्या वस्तूवर जीएसटी लागू केला आहे. घटनेप्रमाणे आरक्षण मिळत नाही. भाजप सरकारने संविधान संपवून मनुवादी कायदा आणायचा असे ठरवले आहे. देशाची घटना बदलून हुकूमशाहीची घटना येते की काय? अशी भीती सध्या वाटत आहे. या पदयात्रेची सांगता सभा सायंकाळी 6 वाजता कराडमधील बुधवार पेठेतील आंबेडकर पुतळ्या समोर होणार आहे. या समारंभास माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण व डॉ. वजाहात मिर्झा तसेच सातार्‍यातील आजी-माजी आमदार-खासदार उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला सौ. रंजना माळी, विवेक गुरव, जयकर अजित ढोले, जितेंद्र परदेशी, सुधीर बारटक्के, संदीप मोहिते, आयुब पठाण, सलमान आवटी, बालम मोमीन उपस्थित होते.

COMMENTS