Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

यशवंतराव चव्हाण तीन दिवसीय व्याख्यानमाला उत्साहात

संगमनेर : सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात महाविद्यालय, संगमनेर व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे बहि:शाल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने

राजर्षी शाहू महाराजांनी भारतीय लोकशाहीचा पाया घातला – प्राचार्य टी. एस. पाटील
सिंधुताईंच्या आठवणीने अकोलेकर गहिवरले…
परमबीर सिंह यांचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप ; चौकशीला सुरुवात | सुपरफास्ट महाराष्ट्र | Lok News24

संगमनेर : सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात महाविद्यालय, संगमनेर व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे बहि:शाल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली.या व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प श्री संभाजी दरोडे सर यांनी गुंफले आपले मत व्यक्त करताना ते म्हणाले की युवक राष्ट्र घडवण्यासाठी महत्वाचे घटक आहे व लोकशाही सुदृढ करण्यासाठी युवकांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे.
व्याख्यान मालेचे दुसरें पुष्प श्रीमती नीलिमा क्षत्रिय मॅडम यांनी गुंफले.त्यांचा व्याख्यानाचा विषय होता ‘माझा लेखन प्रवास’ या विषयावर बोलताना त्या म्हणाल्या की प्रचंड इच्छाशक्ती असली की कोणत्याही वयात आपण आपली कला जोपासू शकतो त्यासाठी वयाची अट नाही असे त्या म्हणाल्या. व्याख्यान मालेचे तिसरे पुष्प श्री अरविंद वसंतराव गाडेकर यांनी गुंफले.त्यांचा व्याख्यानाचा विषय होता ‘व्यंगचित्र जीवन जगण्याची कला ‘या विषयावर आपले मत व्यक्त केले.व्यंगचित्र हा मानवी मनाचा आरसा आणि जीवन जगण्याची कला आहे.जीवनात एक तरी कला अवगत असणे गरजेचे असते.
यावेळी प्रमुख अतिथी पदवीधर मतदार संघाचे मा . डॉ . सुधीरजी तांबे म्हणाले की विद्यार्थ्यांनी आज शिक्षण घेत असताना बहुआयामी व्यक्तित्व बनविण्याकडे लक्ष दयावे महापुरुषांचे चरित्र वाचावे , त्यांचे विचार आचरणात आणावे आणि एक तरी कला जोपासावी कार्यक्रम यशस्वी होणासाठी महाविदयालयाचे प्राचार्य प्रो. डॉ . बाळासाहेब वाघ, उपप्राचार्य डॉ . कोल्हे सर नॅक समन्वयक डॉ. घायवट सर व प्रशासकीय अधिकारी श्री पानसरे सर यांचे सहकार्य लाभले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. स्वाती ठुबे यांनी केले. प्रा. डॉ. अनुपमा कांदळगावकर, प्रा.निलोफर तांबोळी यांचे देखील कार्यक्रमाला सहकार्य लाभले. विदयार्थी प्रचंड संख्येने उपस्थित होते.

COMMENTS