Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा दोन दिवसीय केंद्रीय क्रीडा महोत्सव उद्यापासून

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा दोन दिवसीय केंद्रीय क्रीडा महोत्सव - २०२५ बुधवार दिनांक १२ आणि गुरुवार दिनांक १३ नोव्हेंबर

अहिल्यानगर : बाजरी, ज्वारी पिक कर्ज मर्यादेत वाढ : चेअरमन आ.कर्डिले
जळगावमध्ये कंटेनर उलटल्याने दोघांचा मृत्यू
मी अजूनही राष्ट्रवादीचाच आमदार
Displaying ycmou gate.jpg

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा दोन दिवसीय केंद्रीय क्रीडा महोत्सव – २०२५ बुधवार दिनांक १२ आणि गुरुवार दिनांक १३ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण व बहिःशाल केंद्राच्या वतीने शहरातील केटीएचएम महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित हा महोत्सव होईल. यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मुक्त विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे येत्या दिनांक ०४ ते ०८ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव – २०२५ स्पर्धेसाठी निवड केली जाईल.

       विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली या केंद्रीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. याचे उद्घाटन बुधवार दि. १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.०० वाजता शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते प्रा. सुनील मोरे यांच्या हस्ते होणार आहे. बक्षीस वितरण व समारोप गुरुवार दि. १३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.०० वाजता नागपूर विभागीय संचालक डॉ. धनंजय वेळूकर यांच्या हस्ते होईल. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे दोन्ही कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी असतील. प्र- कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, के. टी. एच. एम. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कल्पना आहिरे, विद्यापीठ परीक्षा नियंत्रक श्री. भटूप्रसाद पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या दोन दिवसीय महोत्सवात कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, टेबल टेनिस, बुद्धिबळ, अॅथलेटिक्स, आणि बॅडमिंटन या खेळांचा समावेश आहे. नाशिकसह अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, नागपूर, कोल्हापूर, मुंबई आणि पुणे अशा आठही विभागीय केंद्रांतील जवळपास ५०४ खेळाडू या महोत्सवात सहभागी होत आहेत, अशी माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव तथा वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे आणि विद्यार्थी कल्याण व बहिःशाल केंद्राचे प्रमुख डॉ. दयाराम पवार यांनी दिली आहे.

COMMENTS