Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपच्या तालुकाध्यक्षपदी यशवंतराव आभाळे

जिल्हा सरचिटणीस पदी सिताराम पा. भांगरे यांची निवड

अकोले ः भाजपच्या तालुकाध्यक्ष पदी यशवंतराव आभाळे यांची तर जिल्हा सरचिटणीस पदी सिताराम पा. भांगरे यांची निवड करण्यात आली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमद

पुणे-नाशिक महामार्गावर पिकअप पलटी.
समता स्पोर्टस क्लब बेलापूरच्या अध्यक्षपदी संजय शेलार
मराठी पत्रकार परिषदेच्या अकोले तालुकाध्यक्षपदी गणेश आवारी

अकोले ः भाजपच्या तालुकाध्यक्ष पदी यशवंतराव आभाळे यांची तर जिल्हा सरचिटणीस पदी सिताराम पा. भांगरे यांची निवड करण्यात आली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे व जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी या निवडीचे पत्र दिले आहे. यशवंतराव आभाळे यांचा प्रशासकीय व संघटन कौशल्याचा प्रदीर्घ अनुभव व दांडगा जन संपर्क लक्षात घेऊन त्यांच्यावर भाजपच्या तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली.
   ते माजीमंत्री मधुकरराव पिचड व भाजपचे अनुसूचित जन जाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री माजी आमदार वैभवराव पिचड यांचे ते विश्‍वासू असून त्यांच्यावर आज पर्यंत दिलेली जबाबदारी त्यांनी सक्षमपणे सांभालेली आहे. अकोले तालुक एज्यूकेशन सोसायटी चे त्यांनी 14 वर्षे सेक्रेटरी म्हणून काम पाहिले आहे. तसेच निळवंडे धरण प्रकल्पग्रस्ताचे आदर्श पुनर्वसन करण्यात त्यांचे  मोठे योगदान आहे. माजीमंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या सोबत सलग 1995 पासून एकनिष्ठपणे काम करीत असून भाजप चे तालुका सरचिटणीस म्हणून सक्षमपणे काम पाहिले आहे. त्यांच्या निवडीने भाजप पक्ष वाढीसाठी मोठी मदत होणार असून कार्यकर्त्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे प्रथमपासून स्वयंसेवक असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या त्यांनी 15 वर्षे विविध जबाबदार्‍या पार पाडल्या.1985 ते 1995 भाजपा चे तालुकाध्यक्ष राहिले. ते एक कुशल संघटक आहेत.त्यानंतर भाजप किसान मोर्चा चे जिल्हाध्यक्ष पद सांभाळले. त्यानंतर तीन वर्षे भाजप युवा मोर्चा चे प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून काम पाहिले. त्यांनी भाजप किसान मोर्चा चे प्रदेश चिटणीस म्हणून काम पाहिले. भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले. भाजप जिल्हा चिटणीस पदावर काम केले. त्यानंतर प्रदेश परिषदेचे सदस्य म्हणून काम पाहिले. त्यानंतर सलग 2014 ते आज पर्यंत भाजप तालुकाध्यक्ष पद सक्षमपणे सांभाळले आहे. त्यांनी तीन लोकसभा निवडणुकीत निरीक्षक म्हणून श्रीगोंदा व पाथर्डी येथे काम केले. राम जन्मभूमी मुक्ती आंदोलनाचे सलग 10 वर्षे नेतृत्व केले. आजपर्यंत च्या राजकीय जीवनात  19 केसेस ला सामोरे जावे लागले.त्यांनी भाजप संघटन वाढी साठी प्रयत्न केले आहे. सीताराम पा. भांगरे यांना बढती दिल्याने त्यांच्या कार्याची ती पावती असल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करीत आहे.

COMMENTS