Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

यश जाजू सी.ए. परीक्षा उत्तीर्ण

अकोले ः इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (आयसीएआय) यांच्या वतीने सन 2024 मध्ये घेण्यात आलेल्या सी.ए. फायनल परीक्षेत यश अजय जाजू याने य

जनावरांसाठी चारा छावणी चालू करा
दहा हजार सायकलींचे विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या हस्ते वाटप
पाण्याअभावी गणेश परिसरातील शेतकरी संकटात

अकोले ः इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (आयसीएआय) यांच्या वतीने सन 2024 मध्ये घेण्यात आलेल्या सी.ए. फायनल परीक्षेत यश अजय जाजू याने यश मिळविले आहे. महाराष्ट्र प्रदेश माहेश्‍वरी सभेचे जनसंपर्क मंत्री पत्रकार अजय व मेघा जाजू यांचा सुपुत्र यश ने 12 वी (विज्ञान) पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सी.ए. करण्याचा निर्णय घेतला.  अल्प कालावधीत वाणिज्य शाखेचे ज्ञान आत्मसात करून सी. ए. फाऊंडेशन ची परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झाला. दरम्यान सी. ए. फायनल परीक्षेच्या तयारी सोबतच सी.एस. (कंपनी सेक्रेटरी) च्या प्रवेश परीक्षेसह फस्ट ग्रुप उत्तीर्ण झाला असून आता सी.एस. (कंपनी सेक्रेटरी) ची फायनल परीक्षा देखील देणार आहे. यशने त्याचा शैक्षणिक प्रवास स्वतःच मार्ग शोधून पूर्ण केला. जिद्द व चिकाटीच्या आधारावर सी.ए. उत्तीर्ण होणार्‍या यश ने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, गुरुजन व मित्र परिवार यांना दिले आहे. यशने आर्टिकलशिप ए. के. चोरडिया अँड कंपनी, नासिक येथे केली. प्रथम प्रयत्नात व चांगल्या गुणांनी सी. ए. परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल यशचे सर्वत्र कौतुक होत आहे.

COMMENTS